आमची मुंबईके पश्चिम विभागगुन्हेमहाराष्ट्रमुंबईविशेष

के/वेस्ट वॉर्ड कार्यालयातील दोन शासकीय कर्मचारी आणि एक खाजगी इसम लाच स्वीकार स्वीकारताना अडकले जाळ्यात

बी एम सी अक्ट १८८८ अन्वये कलम ३१३ चे लायसन्सचा धाक दाखवून मागितले होते वीस हजार रुपये

यशस्वी सापळा कारवाई – अँटी करप्शन ब्युरो, मुंबई

दि. 15 ऑक्टोबर 2025

 

मुंबई : अँटी करप्शन ब्युरो (ACB), मुंबई युनिटने १५ ऑक्टोबर रोजी अंधेरी पश्चिम येथील के/वेस्ट वॉर्ड कार्यालयातील दोन शासकीय कर्मचारी आणि एका खाजगी इसमाविरुद्ध लाच स्वीकार प्रकरणी यशस्वी सापळा रचत कारवाई केली आहे.

तक्रारदार महिला (वय ६०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बीएमसीच्या के/वेस्ट वॉर्डमधील अनुद्याप्ती निरीक्षक अविनाश शांताराम कांबळे (वय ५२) यांनी तक्रारदारांच्या दुकानावरील कारवाई टाळण्यासाठी २०,००० रुपयांची लाच मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम १५,००० रुपये ठरवण्यात आली.

 

अविनाश कांबळे यांनी ही रक्कम शिपाई प्रदीप प्रभाकर खंडागळे (वय ३४) यांच्याकडे देण्यास सांगितली. खंडागळे यांनी तक्रारदाराला सायबर कॅफेतील खाजगी इसम राजू अर्जुन देठे (वय ४४) याला ती रक्कम देण्यास सांगितले. अखेरीस, पंचासमक्ष देठे यांनी १५,००० रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

 

या प्रकरणात गुन्हा क्र. 33/25 भादंवि कलम 7, 7A व 12, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

 

या कारवाईचे पर्यवेक्षण अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. कृष्णा मेखले,

गुन्हा तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुनयना सोनावणे,

तसेच मार्गदर्शन मा. श्री. संदीप दिवाण, अपर पोलिस आयुक्त (ला.प्र.वि., मुंबई),

मा. श्री. अनिल घेरडीकर आणि मा. श्री. राजेंद्र सांगळे, अपर पोलिस उपआयुक्त (ला.प्र.वि., मुंबई) यांनी केले.

 

सक्षम अधिकारी – मा. महानगर पालिका आयुक्त, मुंबई

 

अँटी करप्शन ब्युरोने नागरिकांना आवाहन केले आहे की,

कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती लाच मागणी करत असल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा –

📞 022-24921212 / 022-24922618

📞 टोल फ्री – 1064

📱 WhatsApp – 8828241064

 

— मनीषा झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त (प्रशासन), ACB मुंबई विभाग

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button