महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे आयोजित करण्यात आला गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे श्रद्धांजली कार्यक्रम
ना जातीसाठी ना पातीसाठी एक दिवस पोलिसांसाठी गेट वे ऑफ इंडिया महाराष्ट्राचे गृहमंत्री_दिलीपजी वळसे पाटील साहेब यांच्या उपस्थीत पार पडला कार्यक्रम

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे आयोजित करण्यात आला गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथील श्रद्धांजली कार्यक्रम
ना जातीसाठी ना पातीसाठी एक दिवस पोलिसांसाठी गेट वे ऑफ इंडिया महाराष्ट्राचे गृहमंत्री_दिलीपजी वळसे पाटील साहेब उपस्थीत पार पडला कार्यक्रम
२६/११ निमित्त महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीपजी वळसे पाटील साहेब महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल अर्जुनराव दूबाले व बिगबॉस विजेत्या मेघा घाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वीर जवानांना श्रद्धांजली देण्यात आली.या कार्यक्रमास पोलीस परिवार व मुंबई सह नवी मुंबई,पालघर ,ठाणे व रायगड येथील महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

हा उपक्रम महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे राज्यातील 33 जिल्ह्यामध्ये राबवण्यात आला.२६/११ च्या हल्ल्यामध्ये पोलिसांकडे अत्याधुनिक शस्र नसतानासुद्धा खूप हिमतीने आपल्या जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण केले.त्यांच्या बलिदानाची आठवण कायम रहावी व पोलीस कर्मचार्यांनाचा जनतेने कायम सन्मान करावा असा या कार्यक्रमाचा उद्देश होता असे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल अर्जुनराव दूबाले यांनी सांगितले . गेट वे ऑफ इंडिया मुंबई येथील श्रद्धांजली कार्यक्रम चे आयोजन करता राज्यभर पोलिस कर्मचाऱ्यांना गुलाबाचे फुल देऊन सन्मानित करण्याचा उपक्रम संघटनेच्या वतीने राबविण्यात आला.




