एका दगडात दोन शिकारी! माजी आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांचा मास्टर स्ट्रोक
सुनिल बोले यांचा पाठींबा आणि भाजप मध्ये पक्ष प्रवेश मुळे योगीराज दाभाडकर यांचे पारडे झाले जड

मुंबई – मुंबई महानगर पालिका निवडणूक मध्ये वर्सोवा विधानसभा माजी आमदार डॉ भारतीताई लव्हेकर यांनी एका दगडात दोन शिकार केल्याची चर्चा वॉर्ड क्रमांक 59 मध्ये सुरू झाली आहे. शिवसेना माजी शाखा प्रमुख सुनिल बोले यांचा पाठींबा आणि भाजप मध्ये पक्ष प्रवेश मुळे योगीराज दाभाडकर यांचे पारडे झाले जड झाले असून वॉर्ड क्रमांक 59 मध्ये राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला आहे . मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या धामधुमीत एका महत्त्वाचा घडामोडीत माजी आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांनी आपला राजकीय अनुभव आणि डावपेच पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. एका दगडात दोन शिकारी साधत त्यांनी विरोधकांना चकवा दिला आहे.

कोळी समाजाचे शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख व अपक्ष उमेदवार सुनिल बोले यांनी आपला पाठिंबा योगीराज दाभाडकर यांना जाहीर केला होता. मात्र या राजकीय हालचालींना नवे वळण देत सुनिल बोले यांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात समीकरणे बदलण्याची शक्यता असून, कोळी समाजातील मतदारांवर याचा मोठा प्रभाव पडू शकतो. डॉ. भारतीताई लव्हेकर यांच्या या रणनीतीमुळे भाजपाची ताकद वाढली असून, प्रतिस्पर्धी गटांमध्ये खळबळ उडाली आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय मास्टर स्ट्रोक कुणाच्या बाजूने निर्णायक ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुनिल बोले यांनी योगीराज दाभाडकर यांना दिलेला पाठींबा आणि भाजपा मध्ये केलेल्या पक्ष प्रवेश यामुळे वॉर्ड क्रमांक 59 चे उमेदवार योगीराज दाभाडकर यांचे पारडे जड झालेले पाहायला मिळत आहे



