आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईराजकीय बातमीविशेषसंपादकीयसामाजिक

मुंबईच्या महापौरपदी श्रीमती रितू राजेश तावडे तर उपमहापौरपदी श्री. संजय शंकर घाडी यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहिले उपस्थित

🔹मुंबईच्या महापौरपदी श्रीमती रितू राजेश तावडे तर उपमहापौरपदी श्री. संजय शंकर घाडी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 

🔹बृहन्‍मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ अंतर्गत दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी झाली. या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमधून, अद्ययावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम ३७ (१) अन्वये महापौर व उपमहापौर यांची निवड करण्यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ऐतिहासिक महानगरपालिका सभागृहात आज (दिनांक ११ फेब्रुवारी २०२६) विशेष सभा बोलाविण्यात आली होती.

🔹नामांकन अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत म्हणजे शनिवार, दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजीपर्यंत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षांकडून श्रीमती रितू राजेश तावडे आणि श्री. संजय शंकर घाडी यांचे क्रमश: महापौर आणि उपमहापौर पदासाठी एकमेव नामांकन अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या श्रीमती रितू तावडे यांची तर उप महापौर पदी शिवसेनेचे श्री. संजय घाडी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

🔹या निवडणुकीचे पिठासीन अधिकारी म्हणून महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी कामकाज सांभाळले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे यावेळी उपस्थित होत्या.

🔹महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष श्री. राहूल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. (श्रीमती) नीलमताई गोऱहे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसेच मान्यवरांनी नवनिर्वाचित महापौर श्रीमती रितू तावडे व उप महापौर श्री. संजय घाडी यांचे पुष्पगुच्छ प्रदान करुन अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button