बोईसरमध्ये ‘ब्रह्मांड नायकाच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा
लेखक श्री. विशाल धर्माधिकारी लिखित “ब्रह्मांड नायकाच्या पाऊलखुणा” या पुस्तकाचे 19 मार्च 2026 रोजी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणार प्रकाशन

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे साहित्य व आध्यात्मिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा एक भव्य सोहळा पार पडणार आहे. लेखक श्री. विशाल धर्माधिकारी लिखित “ब्रह्मांड नायकाच्या पाऊलखुणा” या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवार, 19 मार्च 2026 रोजी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम दत्त मंदिर हॉल, पोफरण, बोईसर येथे होणार असून, विविध मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यामध्ये सौ. अक्षता देशपांडे, श्री. विलास शहापुरे, प्रा. संध्या शहापुरे, डॉ. दिगंबर झवर आणि अॅड. मुक्ता भोसले यांचा प्रमुख सहभाग असणार आहे.

लेखक श्री. धर्माधिकारी यांचे हे सहावे पुस्तक असून, “ब्रह्मांड नायकाच्या पाऊलखुणा” हे पुस्तक विशेषतः श्रद्धावान व आध्यात्मिक वाचनाची आवड असलेल्या वाचकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. या पुस्तकामध्ये अध्यात्म, श्रद्धा आणि जीवनातील गूढ पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुचिता पाटील करणार असून, या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



