बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी IAS अश्विनी भिडे; संजीव जैस्वाल यांची घेतली भेट, पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा
अश्विनी भिडे बनल्या मुंबई महानगर पालिकेच्या प्रथम महिला आयुक्त

मुंबई – मुंबई महानगराच्या प्रशासनात महत्त्वाची जबाबदारी सांभाळण्यासाठी IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाचे उपाध्यक्ष / मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैस्वाल यांनी त्यांची भेट घेत त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या भेटीत प्रशासनातील अनुभव, शहरी विकासाच्या विविध बाबींवर चर्चा झाली. अश्विनी भिडे यांचा प्रशासनातील दीर्घ अनुभव, काटेकोर कार्यपद्धती आणि विकासाभिमुख दृष्टिकोन लक्षात घेता, मुंबईच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाला त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरात पायाभूत सुविधा, वाहतूक, पर्यावरण आणि नागरी सेवा यामध्ये सुधारणा करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असते. अशा वेळी अश्विनी भिडे यांची नियुक्ती ही महत्त्वपूर्ण मानली जात असून, त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



