बनावट Brihanmumbai Municipal Corporation अधिकारी अटक, गुन्हा दाखल”
जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपीला पोलिसांनी केली अटक

“बनावट Brihanmumbai Municipal Corporation अधिकारी अटक, गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मुंबईत बनावट Brihanmumbai Municipal Corporation (BMC) के पश्चिम विभाग मध्ये अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित आरोपीने स्वतःला BMC अधिकारी म्हणून ओळख देत विविध ठिकाणी कारवाईची धमकी देऊन पैसे मागितल्याचा आरोप आहे.

जुहू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील N S रोड नंबर 12 येथील एका सोसायटी मध्ये स्टुडिओ दुरुस्तीचे काम सुरू होते त्या ठिकाणी ठेवलेल्या डेब्रिज यावर दीड लाख रुपये दंड आकारला जाऊ शकतो असे सांगून आरोपीने 15 हजार रुपयांची मागणी केली होती
तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडे बनावट ओळखपत्रे आणि कागदपत्रे आढळून आली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे वापरण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणताही अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवूनच व्यवहार करावा आणि संशयास्पद हालचाली त्वरित पोलिसांना कळवाव्यात.



