आमची मुंबईके पूर्वमहाराष्ट्रविशेषसामाजिक

अंधेरी पूर्वेतील के/पूर्व वॉर्डचा गोंधळ नागरिकांसाठी डोकेदुखी

वॉर्डचे नाव बदलले, मात्र बीएमसीची जुनी व्यवस्था कायम; नागरिक त्रस्त, अधिकारी बेफिकीर

अंधेरी पूर्वेतील के/पूर्व वॉर्डचा गोंधळ नागरिकांसाठी डोकेदुख

 

वॉर्डचे नाव बदलले, मात्र बीएमसीची जुनी व्यवस्था कायम; नागरिक त्रस्त, अधिकारी बेफिकीर

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या के/पूर्व वॉर्डाच्या पुनर्रचनेनंतर के/दक्षिण आणि के/उत्तर असे दोन स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. मात्र अंधेरी पूर्व येथील मुख्य कार्यालयावर आजही जुन्या “के/पूर्व” वॉर्डचे बोर्ड कायम असल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कोणत्या कामासाठी कोणत्या कार्यालयात जावे, याबाबत सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

जोगेश्वरी परिसरातील इमारत प्रस्ताव विभागाचे कार्यालय के/उत्तर वॉर्ड कार्यालय म्हणून घोषित करण्यात आले असले, तरी अंधेरी पूर्वेतील मुख्य कार्यालय अद्याप के/दक्षिण वॉर्ड म्हणून कार्यरत आहे. मात्र मुख्य प्रवेशद्वारावर जुने नाव कायम असल्यामुळे पालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

दरम्यान, के/दक्षिण वॉर्डातील सहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला यांच्या निलंबन आणि अटकेनंतर प्रशासनातील गोंधळ अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या जागी अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असला, तरी पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त नसल्याने नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित राहत असल्याची चर्चा आहे.

 

स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, पालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेक फाईल्स आणि प्रशासकीय प्रक्रिया रखडल्या असून त्यावर योग्य ती कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 

आरटीआय कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे तातडीने स्पष्टता आणण्याची मागणी केली आहे. के/दक्षिण वॉर्डासाठी पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त नेमून नागरिकांच्या समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button