आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईराजकीय बातमीविशेषसामाजिक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) ला मुंबईत मोठा राजकीय धक्का

मुंबई मधील विलेपार्ले विधानसभा मधील पक्षातील दोन महत्त्वाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सर्व पदांचा दिली राजीनामा

 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ला मुंबईत मोठा धक्का!

  • मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) ला मुंबईत मोठा राजकीय धक्का बसला आहे मुंबई मधील विलेपार्ले विधानसभा मधील पक्षातील दोन महत्त्वाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याने पक्षाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

राजीनामा पत्रात पक्षासाठी अनेक वर्षे निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करूनही अपेक्षित न्याय, सन्मान आणि प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. तसेच काही समाजघटकांतील कार्यकर्त्यांना संघटनेत योग्य स्थान मिळत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

 

पक्ष संघटनेसाठी दिवस-रात्र मेहनत करूनही कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेतली जात नसल्याने हा निर्णय घेतल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. हा निर्णय कोणत्याही वैयक्तिक आकसातून नव्हे, तर स्वाभिमान आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखण्यासाठी घेतल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या राजीनाम्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

NCP-Sharad-Pawar-Group-Big-Shock-Mumbai-Resignation

#NCP #SharadPawar #MumbaiPolitics #PoliticalBreaking #MaharashtraNews9 #BreakingNews #Mumbai #MaharashtraPolitics #PoliticalCrisis

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button