महाराष्ट्रमुंबईविशेष

पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेची सेवा करणारा समाजकारणी पत्रकार जफर सिद्दीकी

पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेची सेवा करणारा समाजकारणी पत्रकार जफर सिद्दीकी

अमरावती- माणसाने माणसा सोबत माणसा सारखे वागावे. त्यांच्या सुखदुखात सहकार्य करावे असे विचाराचे मनमिळावू व्यक्तिमत्वाचे पत्रकार सिद्दीकी जफरसिद्दीक अब्दुल रशिद यांना त्याच्या वाढदिवसानिमित्य हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजकाल समाज जीवनात सातत्यानं शस्त्रक्रिया करण्याची वेळ येत असतांना सामाजिक प्रश्न सहजपणे सोडवणारे, बिनटाक्याची शस्त्रक्रिया करणारे संयमी, अभ्यासू आणि बांधिलकीच्या भूमिकेतून काम करणारे पत्रकार सिद्दीकी जफ़र सिद्दीक अब्दुल रशिद अत्यंत संयमी, प्रेमळ व संवेदनशील व्यक्तीमत्व, मोजक्याच शब्दात बरच काही सांगण्याचा त्यांचा स्वभाव सूचक पण सहजपणे विविध प्रश्नांची सोडवणूक करणारे व्यक्तिमत्व म्हणजे पत्रकार सिद्दीकी जफरसिद्दीक अब्दुल रशिद, त्यांच्या मनात कपट नाही खुन्नस नाही, व्देष नाही, तिरस्कार नाही. पत्रकारितेच्या माध्यमातून कधी गैरसमजातून कधी चुकून लिहिलं गेलं तर मातृतुल्य प्रेम त्यांनी कधीही कमी केले नाही.

महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळी सोबत जवळचा संबंध असतांना सूध्दा कधीही दुरुपयोग केला नाही. टाइम मॅनेजमेंट, नियोजन, संघटन कौशल्य आणि सहजपणे अशक्य ते शक्य करण्याची किमया हि त्यांच्यात दिसते.. एक वेळ जो व्यक्ती त्यांना भेटला तर त्यांचा स्वभाव मनमिळावू असल्यामुळे त्यांना विसरत नाही. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी भातकुलीतील कित्येक रुग्णासोबत अमरावती नागपूरला दवाखाण्यात स्वतः भरती केले. त्यांना महाविद्यालयीन जीवनापासूनच सामाजिक बांधिलकी म्हणून

काम करण्याची आवड होती. प्रत्येक व्यक्ती आपले जिवन जगत असतांना आपल्या आई वडिलांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी चांगले शिक्षण घेतो. आपल्या पात्रतेनुसार नोकरी व्यवसाय स्वीकारतो. उपजीविकेचे साधन सापडले की, आपली काहीशी धावपळ थंडावते. पण काही व्यक्तींना एवढ्यावर थांबायचे नसते त्यांना अजूनही काहीतरी संपादित करायचे असते. आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. पण काय करायचे आणि कसे करायचे हा प्रश्न अर्ध्याअधिक व्यक्तींना पडत असतो. त्यातच बराच वेळ जातो. पण काही माणसं ज्या कोण्या क्षेत्रात असतात. त्याच क्षेत्रात समाजासाठी काही देण्यासाठी आग्रही असतात. ते जसे आपल्या ऐहिक सुखाचे क्षण लांबणीवर टाकून समाजातील समस्या अडचणी दूर व्हाव्यात. म्हणून झगडत असतात. त्यांना समाजातील समस्या घेऊन लढण्याची एक औरच उर्मी मिळालेली असते. त्यासाठी त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहणे, वेळ देणे, फोन घेणे, इतरांसाठी आपल्या बऱ्याच कामावर तुळशीपत्र ठेवून समोर निघावे लागते. कारण एकच ही त्याची आवड ही त्याची आस्था होउन बसलेली असते. म्हणूनच की काय गाव असो की, शहर सामाजिक उपक्रमात झटणारी माणसं ती चेहरे ठरलेली असतात. त्यांना विचारले तर त्यांना कंटाळा वगैरे येत नाही. ना ते कोणाच्या म्हणण्याने नाउमेद होतात. ते केवळ समाजातील सुख दुःखाच्या प्रसंगी इतरांच्या मदतीला धावून येतात. त्या मोबदल्यात त्यांना एक भेट मिळते ती म्हणजे लोकप्रियता बाकी सर्व यातनाथ.

असेच एक समाजशील व्यक्तीमत्व म्हणजे आमचे मित्र दैनिक बुलंद दुनियाचे संपादक जफ़रसिद्दीकी. जफ़रसिदीकी हे माझे मित्र असून सोमेश्वर टायपिंग इन्सिटयूट मध्ये ते मॅनेजर म्हणून कार्यरत होते. जो पयंत ते माझे इन्सिटयूट मध्ये कार्यरत होते तो पर्यंत मला काहीच फ्रीकर नव्हती. पाच वर्ष त्यांनी इमानदारी ने कार्य केलेत. समाजातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने त्यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून गोरगरीब

जनतेची सेवा केली. अवघ्या काही काळातच

त्यांनी युवक काँग्रेस मध्ये चांगल्या पदावर निवड करण्यात आली.

त्यांनी भातकुली तालुका युवक काँग्रेस मध्यें महासचिव पदावर त्यानंतर भातकुली तालुका काँग्रेस सेवादल ता. अध्यक्ष पदावर अमरावती जिल्हा अल्पसंख्याक महासचिव, आणि अमरावती जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटी च्या संघटन सचिव पदावर जेष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात कार्य केले. स्थानिक काँग्रेस नेत्यांचे हात अधिक मजबूत करण्यासाठी ते काँग्रेस पक्षात काम करू लागले. काँग्रेस पक्षात काम करत असतांना पक्षातही त्यांचे वजन वाढू लागले. त्यांनी आपल्या भागातील नागरिकांच्या समस्या अडचणी समजून घेउन नागरिकांना वेळोवेळी मदत केली. दवाखाण्याचे काम असो. शाळेचे काम असो, सामाजिक, शैक्षणिक, कामात नेहमी अग्रेसर असतात. गावातील रुग्णासांठी रात्री अहोरात्री ते अमरावती नागपूर मध्ये रुग्णांना भरती करण्यासाठी स्वतः रुग्णासोबत जाउन त्याना दवाखाण्यामध्ये भरती करणे संबंधित डॉक्टर सोबत चर्चा करून रुग्णांना सहकार्य करण्याचे कार्य केलेत. जसे समाजकार्य त्यांचे भातकुली या गावी होते तसेच समाजकार्य त्यांचे मुंबईमध्ये सुध्दा आहे. जफ़रसिदीकी मुंबई ला गेल्याने भातकुली मध्ये त्यांची कमी जाणवते. या अष्टपैलू, कर्तृत्वान व्यक्तिमत्वास सोमेश्वर नोकरी संदर्भ परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा..

शिवाजी बापूराव डोंगरे (संपादक – सोमेश्वर नोकरी संदर्भ अमरावती)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button