आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुराव्याला यश अखेर कुर्ला स्कायवॉक झाला सुरू

कुर्ला (पश्चिम) येथील टॅक्सीमेन कॉलनी ते श्रीकृष्ण चौक दरम्यान सीताराम भैरू मार्गावर उभारण्यात आलेला स्कायवॉक अखेर नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुराव्याला यश अखेर कुर्ला स्कायवॉक सुरू

 

कुर्ला (पश्चिम) येथील टॅक्सीमेन कॉलनी ते श्रीकृष्ण चौक दरम्यान सीताराम भैरू मार्गावर उभारण्यात आलेला स्कायवॉक अखेर नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.

 

या प्रकल्पासंदर्भात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रकल्पाची प्रगती आणि उर्वरित कामांची माहिती सार्वजनिक झाली तसेच संबंधित विभागांना प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 

स्कायवॉक सुरू झाल्यानंतर दररोज हजारो पादचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात या परिसरात पाणी साचण्याची समस्या गंभीर होत असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडताना आणि प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अशा परिस्थितीत हा स्कायवॉक नागरिकांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय ठरणार आहे.

 

याशिवाय, पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाल्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होईल. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन वाहनचालक आणि सर्वसामान्य नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.

 

अनिल गलगली यांनी स्कायवॉकच्या दोन्ही बाजूंना उभारण्यात आलेले एस्केलेटरदेखील लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली असून नागरिकांना प्रकल्पाचा संपूर्ण लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button