आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

३५३वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले विनम्र अभिवादन

३५३वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

कुर्ला पश्चिम येथील संत गाडगेबाबा महाराज वसतिगृह परिसरात असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात ३५३वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

 

माजी खासदार पूनम ताई महाजन यांच्या पुढाकाराने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते हे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर सामान्य जनतेसाठी खुले करण्यात आले होते.

 

या विशेष सोहळ्यानिमित्त माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी प्रकाश चौधरी, पवन सिंह, डॉ हेमंत जाधव, उमेश म्हस्के, विशाल वाघ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

या सोहळ्यास कुर्ला विभागातील हजारो शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि शिवराज्याभिषेक दिनाचा उत्सव उत्साहात साजरा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button