आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईराजकीय बातमीविशेषसामाजिक

अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाची ‘उड्डाण २०२६’ संघटनात्मक कार्यशाळा मुंबईत दिमाखात संपन्न

कार्यशाळेस महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व तामिळनाडू या राज्यांतील प्रांतीय पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची लाभली विशेष उपस्थिती

अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाची ‘उड्डाण २०२६’ संघटनात्मक कार्यशाळा मुंबईत दिमाखात संपन्न

मुंबई : अखिल भारतीय मारवाडी युवा मंचतर्फे क्षेत्र-५ मधील प्रांतीय व शाखा पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली ‘उड्डाण २०२६’ संघटनात्मक कार्यशाळा मुंबई संभागाच्या आतिथ्यात उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध नियोजन आणि भव्य वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यशाळेस महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व तामिळनाडू या राज्यांतील प्रांतीय पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या ढोल-ताशांच्या गजरात मान्यवरांच्या स्वागताने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. देशभरातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक अधिवेशनाचे स्वरूप प्राप्त झाले. मुंबई शाखेचे श्री विक्रम शर्मा यांनी आपल्या प्रभावी व ओजस्वी शैलीत सूत्रसंचालन केले. तर संपूर्ण कार्यशाळेचे संचालन माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री अमित अग्रवाल व राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री राहुल अग्रवाल यांनी केले.

कार्यशाळेदरम्यान संघटन बळकटीकरण, प्रभावी नेतृत्व विकास, आधुनिक कार्यपद्धती, डिजिटल माध्यमांचा वापर, शाखा विस्तार, सदस्यता अभियान, सामाजिक प्रकल्पांचे नियोजन, आर्थिक व्यवस्थापन तसेच आगामी वर्षातील विविध उपक्रम व प्रकल्पांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विविध राज्यांतून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करत यशस्वी उपक्रम व नाविन्यपूर्ण संकल्पनांची माहितीही दिली.

यावेळी अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुरेश एम. जैन यांनी संघटनेच्या भावी वाटचालीवर प्रकाश टाकत युवक शक्तीला समाजसेवेशी जोडण्याचे आवाहन केले. माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित अग्रवाल यांनी संघटनात्मक शिस्त, नेतृत्वगुण आणि टीमवर्कचे महत्त्व अधोरेखित केले. महाराष्ट्र प्रांतीय अध्यक्षा सौ. अमृता भूतडा, राष्ट्रीय मीडिया व टेक्नॉलॉजी फोरमचे चेअरमन श्री सुनील जैन खाबिया, प्रांतीय महामंत्री श्री प्रवीण करवा तसेच माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री रामकिशोर वर्मा यांनी विविध विषयांवर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

 

या कार्यशाळेचे संपूर्ण नियोजन वरिष्ठ मंचिष्ठ व राष्ट्रीय मीडिया आणि टेक्नॉलॉजी फोरमचे चेअरमन श्री सुनील जैन खाबिया यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी मुंबई संभागाच्या संपूर्ण टीमसह विशेष परिश्रम घेतले. देशाच्या विविध भागांतून आलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी उत्कृष्ट निवास, भोजन व वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती.

 

मुंबई संभागाचे प्रांतीय उपाध्यक्ष सीए अमित मल्लावत, प्रांतीय समन्वयक प्रदीप शर्मा, जितेंद्र कोठारी, मुंबई शाखाध्यक्ष सीए कपिल कर्नावट, योगेश पटेल, सुधीर खाबिया, आशिष टिबडेवाल, जितेंद्र तापडिया, प्रशांत घोडेला, भायंदर शाखाध्यक्ष सीए अभिषेक राठी, शिवरतन दमाणी, नितीन शर्मा, अंकित राठी, रामानुज भट्टड तसेच संपूर्ण कार्यकर्त्यांच्या टीमने कार्यक्रमाच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या उत्कृष्ट नियोजन व आदरातिथ्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मुक्तकंठाने कौतुक केले.

 

संपूर्ण कार्यशाळेदरम्यान उत्साह, सहभाग आणि संघटनात्मक ऊर्जेचे वातावरण अनुभवायला मिळाले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या कार्यशाळेला संघटनेच्या विकासाला नवी दिशा देणारी आणि भविष्यातील कार्यांना गती देणारी अत्यंत उपयुक्त कार्यशाळा असे संबोधले. ‘उड्डाण २०२६’ अंतर्गत आयोजित ही कार्यशाळा संघटनेची भावी दिशा निश्चित करण्यात तसेच विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय, संवाद आणि संघटनात्मक एकता अधिक दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button