आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषशैक्षणिकसामाजिक

एकता मंच व भुआल सिंग फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

एकता मंच चे अध्यक्ष प्राचार्य अजय कौल सर यांचा विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा 

एकता मंच व भुआल सिंग फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

एकता मंच चे अध्यक्ष प्राचार्य अजय कौल सर यांचा विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा

मुंबई – मुंबईतील वर्सोवा परिसरातील सेवन बंगलोज येथील सागर कुटीर येथे प्राचार्य अजय कौल सर यांच्या एकता मंच आणि भुआल सिंग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत दप्तर व वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क असून कोणताही विद्यार्थी शैक्षणिक साहित्याअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना नवीन शालेय वर्षाची सुरुवात आत्मविश्वासाने करता यावी आणि त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी दप्तर व वह्यांचे वितरण करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील सर्व घटकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य हा या उपक्रमाचा खरा यशस्वी क्षण ठरला.

 

एकता मंच आणि भुआल सिंग फाऊंडेशन यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळाली असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना सहाय्य करण्याचा निर्धार संस्थांनी व्यक्त केला.

 

शिक्षणामध्ये केलेली गुंतवणूक ही उज्ज्वल भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावल्यास सक्षम आणि सशक्त समाज निर्माण होऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button