आमची मुंबईगुन्हेमहाराष्ट्रविशेष

मुंबईत अज्ञात इसमाचा मृतदेह सापडलाएम एच बी पोलिस ठाण्याचे ओळख पटवण्याचे आवाहन

दहिसर परिसरात धक्कादायक प्रकार अनोखळी व्यक्तीचा सापडला मृतदेह डाव्या हाताच्या मनगटावर इंग्रजीत “BS” असे गोंदलेले नाव 

 

मुंबईत अज्ञात इसमाचा मृतदेह सापडलाएम एच बी पोलिस ठाण्याचे ओळख पटवण्याचे आवाहन

 

दहिसर परिसरात धक्कादायक प्रकार अनोखळी व्यक्तीचा सापडला मृतदेह डाव्या हाताच्या मनगटावर इंग्रजीत “BS” असे गोंदलेले नाव

मुंबई : एम. एच. बी. कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. २१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५:३० वाजण्याच्या सुमारास दहिसर नदी पात्रातील कच्च्या रस्त्यालगत हा मृतदेह आढळून आला.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत इसम पुरुष असून वय अंदाजे ३० ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे. त्याने फिकट पांढऱ्या रंगाची पँट आणि फुल बाह्यांचा शर्ट परिधान केला असून शर्टवर चौकडी डिझाइन आहे. तसेच अंगात पांढऱ्या रंगाचे सॅंडो बनियन असल्याचेही आढळून आले आहे.

 

मृतदेहावर विशेष ओळख म्हणून डाव्या हाताच्या मनगटावर इंग्रजीत “BS” असे गोंदलेले असल्याचे पोलीसांनी नमूद केले आहे. सदर इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

 

या मृत इसमाबाबत कोणाला काही माहिती असल्यास एम. एच. बी. कॉलनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क क्रमांक:

वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिप गावळी – ९८२१५०७०५४

पोलीस निरीक्षक दिलीप इंगळे (तपासी अधिकारी) – ९९२३१०७०५१

पोलीस निरीक्षक किरण सुर्वे – ७३७८८८८८८८

पोलीस निरीक्षक अतुल आहेर – ९६८७४२०४८०

पोलीसांकडून नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button