मंडणगडमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय बातमी

मंडणगड नगरपंचायतीत स्वीकृत नगरसेवक विषय समित्यांची सभापती निवडीचा कार्यक्रम संपन्न.

हरेष मर्चंडे यांची स्विकृत नगरसेवक पदी वर्णी

हरेष मर्चंडे यांची स्विकृत नगरसेवक पदी वर्णी.

अनिरुध्द कदम (दापोली प्रतिनिधी) – मंडणगड दि.१६ फेब्रुवारी २९२२ मंडणगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व उपगनराध्यक्ष पदांचे निवडीनंतर गुरुवार १७ फेब्रुवारी २०२२ रोजी निवडणुक निर्णय अधिकारी भाग्यश्री मोरे, मुख्याधिकारी विनोद डवले यांच्या उपस्थितीत नगरपंचायत कार्यालयात स्वीकृत नगरसेवक व विषय समिती सभापती पदांचे निवडणुकीचा कार्यक्रम राबवण्यात आला.

मंडणगड नगरपंचायत नगरसेवकांचा संख्याबळ व पक्षीय बलाबलाचे गणित लक्षात घेऊन महाविकास आघाडी व शहर विकास आघाडीस प्रत्येक एक स्विकृत नगरसेवक नियुक्त कऱण्याची संधी मिळाली. महाविकास आघाडीतून हरेष मर्चंडे यांची स्विकृत नगरसेवकपदी वर्णी लावण्यात आली आहे. स्विकृत नगरसेवकांचे निवडीनंतर विषय समिती सदस्य व सभापती निवडीचा कार्यक्रम राबवण्यात आला.
१)स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती नगराध्यक्ष सोनल बेर्डे यांच्याकडे आहे.

त्यानुसार नगरपंचायत २) बांधकाम समिती सभापती पदी नगरसेविका प्रियांका लेंडे यांची निवड झाली आहे.

३)स्वच्छता, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्षपदी उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांची यांची निवड झाली.

४)पाणी पुरवठा समिती सभापतीपदी नगरसेवक सुभाष सापटे यांची निवड झाली.

५)महिला बालकल्याण समितीचे अध्यक्षपदी नगरसेविका सौ.राजश्री सापटे यांची तर उपाध्यक्षपदी सेजल गोवळे यांची निवड झाली.

निवडणुक निर्णय अधिकारी भाग्यश्री मोरे,व मुख्याधिकारी विनोद डवले यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button