आमची मुंबईके पश्चिम विभागनागपूरमहाराष्ट्रमुंबईराजकीय बातमीवर्सोवा विधानसभाविशेषसामाजिक

महापालिका निवडणुकीतील वॉर्ड क्रमांक ६३ मधून विजयी झाल्याबद्दल नगरसेवक रुपेश सावकर यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून अभिनंदन

रूपेश सावरकर यांनी माजी विरोधी पक्षनेते बाळा आंबेरकर यांच्या केला होता पराभव

महापालिका निवडणुकीतील विजयाबद्दल नगरसेवक रुपेश सावकर यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, – नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबई महानगर पालिका माजी विरोधी पक्षनेते बाळा आंबेरकर यांचा पराभव करून मिळविलेल्या दैदीप्यमान विजयाबद्दल नगरसेवक वॉर्ड क्रमांक ६३ चे नगरसेवक रुपेश गजानन सावकर यांचे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

यासंदर्भात पाठविण्यात आलेल्या पत्रात बावनकुळे यांनी सावकर यांच्या विजयाला समाजासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी म्हटले आहे. या विजयातून समाजसेवेची ऊर्जा अधिक बळकट होईल आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जनतेने दाखविलेला विश्वास, प्रेम आणि अपेक्षा हीच आपल्या कार्याची खरी पावती असल्याचे सांगत, पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि निष्ठेने लोकहिताची कामे करण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या संघटन वृद्धीसाठीही प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी व विकासकामांसाठी आवश्यक ती मदत करण्यास आपण सदैव उपलब्ध राहू, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. आपल्या सेवाभावी कार्यात आपणास नेहमीच साथ असेल, असे आश्वासन देत सावकर यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

या अभिनंदन पत्रामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button