आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

 इंडियन बँक चे फील्ड जनरल मॅनेजर दीपक गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पार पडले स्वच्छता अभियान

इंडियन बँकेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ अंतर्गत सात बंगला सागर कुटीर येथे भव्य स्वच्छता अभियान

मुंबई – इंडियन बँकेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ अंतर्गत सात बंगला सागर कुटीर येथे भव्य स्वच्छता अभियान पार पडले . सदर अभियान इंडियन बँक चे फील्ड जनरल मॅनेजर दीपक गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

स्वच्छता अभियान  देशपातळीवर सुरू असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ उपक्रमाचा भाग म्हणून इंडियन बँकेच्या वतीने सात बंगला सागर कुटीर येथे भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व इंडियन बँक चे फील्ड जनरल मॅनेजर श्री. दीपक गुप्ता यांनी केले.

 

 

या कार्यक्रमात मुंबई दक्षिण झोनल मॅनेजर श्री. रवींद्र सिंग व मुंबई पश्चिम झोनल मॅनेजर श्री. राजेश मुंद्रा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत श्रमदान केले.

 

स्वच्छता उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना “स्वच्छतेतूनच सेवाभावाची जाणीव” हा संदेश देण्यात आला स्वच्छतेची शपथ देखील घेण्यात आली.इंडियन बँकेकडून आयोजित या अभियानाला स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button