एकता मंचचे अध्यक्ष प्राचार्य अजय कौल सर यांच्या नेतृत्वात इंटरनॅशनल कोस्टल क्लिनिंग डे निमित्त सात बंगला सागर कुटी येथे स्वच्छता उपक्रम
दिनांक – 20 सप्टेंबर 2025 (शनिवार) रोजी सात बंगला सागर कुटी समुद्रकिनारा सकाळी 7 ते सकाळी 8 होणार स्वच्छता अभियान
एकता मंचचे अध्यक्ष प्राचार्य अजय कौल यांच्या नेतृत्वात इंटरनॅशनल कोस्टल क्लिनिंग डे निमित्त सात बंगला सागर कुटी येथे स्वच्छता उपक्रम

मुंबई (17 सप्टेंबर) – संपूर्ण जगभरात साजरा होणाऱ्या इंटरनॅशनल कोस्टल क्लिनिंग डे च्या निमित्ताने एकता मंचतर्फे सात बंगला सागर कुटी समुद्रकिनारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे नेतृत्व एकता मंचचे अध्यक्ष प्राचार्य अजय कौल सर करणार आहेत.
📍 स्थळ – सात बंगला सागर कुटी समुद्रकिनारा
📅 दिनांक – 20 सप्टेंबर 2025 (शनिवार)
⏰ वेळ – सकाळी 7 ते सकाळी 8
या मोहिमेत परिसरातील नागरिक, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, सामाजिक संस्था व एकता मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

स्वच्छता उपक्रमाद्वारे प्लास्टिक, थर्माकोल, बाटल्या, कॅन्स, पिशव्या तसेच इतर कचरा गोळा करून समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला जाणार आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा आणि समुद्रकिनारी स्वच्छता राखावी, असे आवाहन प्राचार्य अजय कौल यांनी केले आहे.
या मोहिमेमुळे सात बंगला परिसर अधिक स्वच्छ, आकर्षक होण्यास मदत होईल तसेच नागरिकांमध्ये पर्यावरण जनजागृतीही निर्माण होईल




