बहुजन लोककल्याण सेवा संघाच्या वतीने महामानव भारतरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी केले अभिवादन
अंधेरी पश्चिम, इंफिनिटी मॉल समोरील ब.लो.से जनसंपर्क आणि जनसेवा केंद्रात पार पडला कार्यक्रम

बहुजन लोककल्याण सेवा संघाच्या वतीने
महामानव भारतरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी येथील लिंक रोड अंधेरी पश्चिम, इंफिनिटी मॉल समोरील ब.लो.से जनसंपर्क आणि जनसेवा केंद्रात वर्सोवा आणि अंधेरी मधील सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक आणि प्रशासकीय मान्यवरांच्या तसेच समाजबांधवांच्या उपस्थितीत “महामानवाला अभिवादन” करण्यात आले. ६ डिसेंबर हा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन या दिवशी जगभरातील आंबेडकर अनुयायी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देतात त्यांचे ऋण हे कधीही न फिरणारे म्हणूनच नतमस्तक हा करोडो समाजबांधव आज देखील या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या कर्तुत्वाला आणि दातृत्वाला विनम्र अभिवादन करत असतात. या कार्यक्रमाचे आयोजक बहुजन लोककल्याण सेवा संघाच्या कार्यकारी मंडळाने येथील राजकीय आणि सामाजिक आशा दोन्ही क्षेत्रातील मान्यवरांना आपल्या समाजाला सोबत घेऊन या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक ५९ च्या नगरसेविका तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका, बाजार व उद्यान समिती अध्यक्षा सौ.प्रतिमा शैलेश खोपडे, प्रभाग क्रमांक ६२ चे नगरसेवक श्री राजू श्रीपाद पेडणेकर, माजी कुलगुरू श्री अर्जुन मुरुडकर, कायदेविषयक मार्गदर्शक श्री नारायण गायकवाड, उपविभागप्रमुख श्री राजेश शेट्ये, उपशाखा प्रमुख श्री राजू नेटके, भीमसैनिक श्रीमंत तोरणे, श्री पी.बी.कोकरे, बहुजन लोककल्याण सेवसंघाचे अध्यक्ष श्री संदीप अनंत जाधव , कार्याध्यक्ष श्री गोविंद वाघमारे, सचिव श्री ज्ञानेश्वर गणपती कारंडे, कोषाध्यक्ष श्री अनिल चाबुकस्वार, सहसचिव श्री भगवान गायकवाड, संघटक श्री विकास जाधव, संघटक श्री अजय कांबळे, यांसह येथील बहुसंख्य आंबेडकरी अनुयायी या अभिवादनास उपस्थित होते. कार्यक्रमात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सामुदायिक त्रिसरण पंचशील घेऊन कार्यक्रम सुरुवात केली. सामाजिक जाणिवेतून आपण सर्व बांधवांनी समाजाने एकत्र येऊन सर्वच महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रम करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण केले पाहिजे जेणेकरून पुढील पिढीला हा वारसा पुढे घेऊन जाता येईल या विचारांनी एकत्र येऊन कार्य करायचे या ठरावाने संस्थेला राजकीय सामाजिक वा शैक्षणिक क्षेत्रातील कोणत्याही उपक्रमास आमचे तन मन धनाने सहकार्य राहील हा विश्वास बाजार व उद्यान समिती अध्यक्षा सौ प्रतिमा शैलेश खोपडे व नगरसेवक श्री राजू श्रीपाद पेडणेकर यांनी शब्द सुमनांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास दिवसभर अनेक सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते आवर्जून आपली उपस्थिती देऊन महामानवाला आदरांजली दिली.



