अंधेरी पश्चिम मधील भाजपच्या माजी नगरसेविका रेणू हंसराज यांचा शालेय विद्यार्थ्याना एक हात मदतीचा

अंधेरी पश्चिम मधील भाजपच्या माजी नगरसेविका रेणू हंसराज यांचा शालेय विद्यार्थ्याना एक हात मदतीचा
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला जातो, शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार, मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोरोना ह्या जागतिक संकटामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. देशभरातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता जरी स्थिती पूर्वतत होत असली तरी देखील शिक्षणासारख्या मूलभूत सुविधें सदर्भात कोरोनाच्या साथीने नव्याने विचार करायला भाग पाडले आहे.

या नव्या विचारातूनच मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील तब्बल २१ गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी १ लाख १५ हजार रुपयांची छोटीशी मदत करण्यात आली असल्याचे रेणू हंसराज यांनी सांगितले. या आधी देखील महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा दिवस राबवत आपल्या विभागातील २५ गरजू विद्यार्थ्यांना जवळपास दोन लाख पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत रेणू हंसराज यांच्या प्रयत्नाने करण्यात आली होती.



