*शिवसेनेच्या पुढाकाराने आता गणपत पाटील नगर येथील नागरिकांची वीज समस्या कायमची सुटली

*शिवसेनेच्या पुढाकाराने आता गणपत पाटील नगर येथील नागरिकांची वीज समस्या कायमची सुटली .
गणपत पाटील नगर मधील २ हजार घराना मिळणार वीज कनेक्शन*
*बोरिवली पश्चिम प्रभाग क्रमांक 1 मधील शिवसेना नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांच्या सहकार्याने गणपत पाटील नगर येथील दोन हजार घरांची विजेची समस्या आता कायमची सुटली आहे. या ठिकाणी एनर्जी सबस्टेशनचे उद्घाटन शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती (राज्यमंत्री दर्जा) व नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.याप्रसंगी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान या कामाचे श्रेय घेण्यासाठी अनेकांनी धावाधाव सुरू केली होती.मात्र स्थानिकांनी केवळ शिवसेनेमुळेच आम्हाला न्याय मिळाल्याचे सांगत विरोधकांना झिडकारले.*

*सीआरझेड बाधित विभाग असल्याने या ठिकाणी वीजेच्या अभावी नागरीकांना अनेक समस्या सदैव भेडसावत होत्या. हे लक्षात घेता राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका तसेच टाटा वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून योग्य पाठपुरावा तसेच कायदेशीर परवानगी घेऊन म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नागरिकांना दिलासा देण्याचे काम शिवसेनेच्या माघ्यमातून करण्यात आले आहे.

नवीन वर्षांची भेट म्हाणून तब्बल 2 हजार घरांना वीज कनेक्शन मिळणार आहे. यापूर्वी देखील दहिसर विधानसभामध्ये पहिल्यादा वाहन एनर्जी बुस्टर सब स्टेशन गल्ली नं. १० येथे स्थापित करून एनर्जी सबस्टेशनच्या माध्यामातून जुलै २०२१ रोजी 1 हजार घरांना वीज देण्यात आली होती. या ठिकाणी शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रयत्नाने यापूर्वीच पाण्याचा जटिल प्रश्न देखील सोडविण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रभागात हजारो लोकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून आता बूस्टर सबस्टेशनमुळे नागरिकांच्या विजेचा प्रश्न देखील सुटणार आहे. आज या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक,मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, शाखा संघटक ज्यूडीथ मेंडोसा, युवा सेनेचे जीतेन परमार, दर्शित कोरगावकर, लालचंद पाल, अखिलेश सिंग, सहित स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*




