आपली मुंबईमहाराष्ट्रमुंबईसामाजिक

आझाद हिंद संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.सतीशचंद्र रोठे यांनी मागितली आत्मदहनची करण्यासाठी परवानगी

महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनता कष्टकरी शेतकरी मजूर यांचे होणारे अतोनात हाल व त्यामुळे निरपराध कष्टकरी कामगारांच्या आत्महत्यांचे सुरू असलेले सत्र

प्रति Ho
1)माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री,म.रा.मूंबई.
2) माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
3)माननीय श्री अनिलजी परब साहेब,परिवहन मंत्री
4)माननीय अजितदादा पवार साहेब,उपमुख्यमंत्री,
5)माननीय श्री शेखर चेन्ने साहेब, एमडी महाराष्ट्र, राज्य परिवहन महामंडळ
(महाराष्ट्र राज्य, मंत्रालय,मुंबई 0032)

   संदर्भ क्रमांक एक :

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यासाठी चार नोव्हेंबर 2021 पासून सुरू असलेला राज्यव्यापी दुखवटा. आणि 47 कष्टकरी कामगार कर्मचाऱ्यांनी आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे केलेल्या आत्महत्या..

 संदर्भ क्रमांक दोन : 

महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनता कष्टकरी शेतकरी मजूर यांचे होणारे अतोनात हाल व त्यामुळे निरपराध कष्टकरी कामगारांच्या आत्महत्यांचे सुरू असलेले सत्र.

विषय:- उपरोक्त प्रती नमूद आपनच नेते आणि अधिकारी तूमच्या चुकीच्या धोरणांना आणि कारभाराला कंटाळून मुंबईस्थित मुख्यमंत्री निवास वर्षा,मातोश्री, आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर आत्मदहन करणेबाबत.

अर्जदार: ऍड.सतीशचंद्र दिनकर रोठे, राष्ट्रीय अध्यक्ष, आझाद हिंद शेतकरी संघटना.

मांगनी:
डिसेंबर 2021 पूर्वी महामंडळाचे शासनात विलीनीकरण जाहीर न झाल्यास,मुंबईतील मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे निवासस्थान वर्षा, मातोश्री, आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर आत्मदहन करणे करिता परवानगी मिळणे बाबत..,

महोदय,
उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये आपणास सविनय तक्रार विनंती वजा मागणी करीत आत्महत्या करण्याची परवानगी देण्याचा सविनय रीतसर अर्ज सादर करीत आहे.

1)आज नांदेड येथील वाहक कै दिलीप विठ्ठल विर यांचा देह नांदेड आगारातील मेन गेट वर ठेवण्यात आला आहे.
श्रद्धांजली सभेतच श्रद्धांजली समर्पित करीत असतांना एका महिला कर्मचाऱ्याला अटँक आला.

2)आजपर्यंत एकूण 47 कष्टकरी,कामगार कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करीत लढा विलीनीकरणाचा यशस्वी होण्यासाठी शहीद झाले आहे. हा सर्व प्रकार पाहून मी खूप व्यथित झालो आहे. मायबाप सरकारला विनंती, मागणी,आंदोलन करून थकलो आहे. एकंदरीत सर्व परिस्थिती एक संवेदनशील माणूस म्हणून माझ्यासाठी असहनीय आहे.

3)दैनंदिन आत्महत्यांचे सत्र थांबवण्यासाठी मी खूप प्रयास करत आहे. परंतु आत्महत्यांचे सत्र थांबत नाही. आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या भेटी घेतल्या नंतर, त्यांचे दुःख पाहिल्यानंतर मी अत्यंत व्याकूळ व्यथीत झालो आहे. एसटी महामंडळातील कष्टकरी कामगार कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी, तर यापुढे शेकडो-हजारो कष्टकरी कामगारांच्या आत्महत्या होण्यापूर्वी सरकारला मी माझे बलिदान देण्याचा निर्णय घेत आहे.

4)आघाडी सरकारच्या नमूद नेत्यांना व एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कारणीभूत ठरवत मी हा निर्णय घेतला आहे.

5)आघाडी सरकारला आणखी किती कामगार कष्टकऱ्यांचे जीव लागतात…?
आघाडी सरकारने एकदाच जाहीर करावे.

6)महाराष्ट्रातील एसटी कामगार,कष्टकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारला शेवटचा बळी म्हणून मी माझ्या प्राणांची आहुती देत आहे.

7)डिसेंबर महिन्यात एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण जाहीर न केल्यास डिसेंबर महिन्यात केव्हाही मी ऍड.सतीशचंद्र दिनकर रोठे, आझाद मैदानावर, मातोश्री, वर्षा निवास, किंवा मंत्रालयासमोर येऊन आत्मदहन करणार आहे.
माझाआत्महत्येस सर्वस्वी महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, देशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मंत्री अनिलजी परब साहेब, यासह माझ्या कष्टकरी कर्मचारी बांधवांवर दबाव आणणाऱ्या महाराष्ट्र महामंडळाचे उच्चस्तरीय सर्व अधिकारी, कृती समितीच्या दलाल संघटनांचे सर्व पदाधिकारी जबाबदार राहतील.

8)हीच माझी सुसाईड नोट समजून संबंधितावर माझ्या व आज पर्यंत झालेल्या सत्तेचाळीस कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे.
हीच शेवटची कळकळीची विनंती.

9)न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणून मी आज जागतिक एँडव्होकेट दिनाच्या दिवशी आत्महत्या करण्याची परवानगी सरकारला मागत आहे.

10)माझ्या आत्मदहनानंतर जर एसटी महामंडळाचे विलीनीकरण शासनात होत असेल आणि शहीद झालेल्या 47 कुटुंबांना त्यांच्या कुटुंब प्रमुखाच्या मरणोत्तर न्याय मिळत असेल, 11)त्यांच्या परिवारातील सदस्यांना शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेतल्या जात असेल,
12)त्यांच्या मुलाबाळांना शासकीय कर्मचार्‍यांच्या नियमाप्रमाणे सर्व मोबदला मिळत असेल तर मी आत्मदहन करण्यास तयार आहे.
13) माझ्या परिवाराची आणि आझाद हिंद संघटनेच्या परिवाराची जबाबदारी माझे एसटी कामगार कष्टकरी घेतीलच पाणी त्यांच्या जीवित वाचेल काही बरेवाईट झाल्यास त्यास सरकारल जबाबदार राहील. ही विनंतीही या निमित्ताने करीत आहे.
14)या सुसाईड नोट मध्ये नमूद प्रत्येक मागणीची विनंती ची पूर्तता होईल हीच माफक अपेक्षा विनंती मागणी आहे.
15) आज 4 डिसेंबर 2021 रोजी बुलडाणा स्थित उपरोक्त नमूद सर्व गैरअर्जदार नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे मी आत्मदहनाचा निर्णय कोणताही नशापाणी न करता पूर्ण सद्सद्विवेक बुद्धीने जाहीर करीत आहे.
16)निर्लज्जम सदासुखी याप्रमाणे कामगार कष्टकऱ्यांच्या आत्महत्यांवर राज्यकर्ते सरकार चालवणार आहेत का..?
संविधानिक मार्गाने सुरू असलेला कष्टकरी, कामगारांचा दुखवटा संप हुकूमशाही पद्धतीने दडपण्याचा प्रकार आघाडी सरकारला अशोभनीय आहे.
या घृणास्पद निंदनीय प्रकाराचा निषेध आझाद हिंद शेतकरी संघटना करीत आहे.
17)महामंडळातील असंख्य घोटाळे सरकारला दिसत नाहीत काय..?
18)सर्वसामांन्य कामगारांना डेपोमधून दुखवट्याचे टेन्ट काढण्याचे आदेश काढण्यात आले.,
19)संपक-यांवर दबावतंत्राचा अवलंब करून त्यांना आत्महत्येस सरकार प्रवृत्त करीत आहे.
न्यायिक हक्काप्रमाणे कामगार कष्टकरी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे.
यासाठी चार नोव्हेंबर 2021 पासून संविधानिक मार्गाने दुखवटा पाळत आहे.
असे असतांना कामगार कष्टकऱ्यांच्या भावनांना पायदळी तुडवीत आघाडी सरकारचे मंत्री सर्वसामान्यांची दिशाभूल करीत आहे.
20)एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी सुरु असलेला राज्यव्यापी दुखावटा न्यायिक संविधानिक आहे.
महाराष्ट्रातील 80 टक्के सर्वसामान्य नागरिक एसटी कामगार कष्टकरी यांच्यासोबत आहे.
21)सरकारने त्वरित दखल न घेतल्यास मोठी किंमत महाराष्ट्रातील आघाडी सरकारला चुकवावी लागणार आहे.
संपकरी यांना चर्चेसाठी बोलवणे, त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणे, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे, न्यायिक संविधानिक मार्गाने सुरू असलेला दुखवटा मोडून काढण्यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कामाला लावणे, कृती समितीच्या दलाल नेत्यांना हाताशी धरून कामगार कष्टकरी यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा कुटील डाव सरकारचा आहे. या सर्व घटनांचा जाहीर निषेध करीत आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने 4 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावरुन जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे महोदय आपणास रीतसर निवेदन सादर करण्यात आलेले आहे.
22)नम्र विनंती मागणी महामंडळातील आज पर्यंत देण्यात आलेले सर्व कंत्राट, सुरु असलेली शिवनेरी बस सेवा याची उच्चस्तरीय चौकशी करावी. यामधील दोषींची मालमत्ता शासन जमा करून हे सरकार छत्रपती शिवरायांच्या विचारांवर, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर कार्यरत आहे हे सिद्ध करून दाखवावे.
तेंव्हाच भगवा घेऊन जय भवानी..! जय शिवाजी..! म्हनण्याचा अधिकार सरकारला आहे.

23) एसटी महामंडळाचे विलीनीकरण करून त्वरित तोडगा न काढल्यास डिसेंबरला महिन्यात केव्हाही आझाद हिंद शेतकरी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी मुंबईतील मातोश्री, वर्षा निवास, आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर येऊन आत्मदहन करनार आहे.
तरी उपरोक्त 23 मुद्दे आणि संदर्भीय,विषयांवर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा

ऍड.सतीशचंद्र रोठे,
राष्ट्रीय अध्यक्ष,
आझाद हिंद शेतकरी संघटना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button