आमची मुंबईके पश्चिम विभागमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

विकासक कितीही मोठा असो, BMC चा दणका बसणारच! लोखंडवाल्यात कल्पतरूला ₹१.७५ लाखांचा दंड!

के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता मानस जंजिराल ॲक्शन मोडवर 

विकासक कितीही मोठा असो, BMC चा दणका बसणारच! लोखंडवाल्यात कल्पतरूला ₹१.७५ लाखांचा दंड!

सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता मानस जंजिराल ॲक्शन मोडवर

(मुख्य संपादक-  नागेश कळसगौंडे | स्पेशल रिपोर्ट) – मुंबईच्या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या कल्पतरू विकासकावर के पश्चिम विभागाची धडक कारवाई केली असून के पश्चिम चे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली घन कचरा व्यवस्थापनचे सहाय्यक अभियंता मानस जंजिराल व अधिकारी ॲक्शन मोडवर आले आहेत.

मुंबई महानगर पालिका के पश्चिम विभागाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक मुख्य पर्यवेक्षक अंकुश म्हापलकर पावती देताना

मुंबईतील लोखंडवाला परिसरात बांधकामाच्या नावाखाली सार्वजनिक रस्त्यांवर अस्वच्छता निर्माण करणाऱ्या कल्पतरू विकासकाला मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम विभागाने चांगलाच दणका दिला आहे.

रस्त्यावर घाणीचे साम्राज्य, बांधकामाशी संबंधित निष्काळजीपणा आणि नागरिकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या विकासकाला तब्बल १ लाख ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावत पालिकेने आपली कारवाई दाखवून दिली आहे.

के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता मानस जंजिराल यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक मुख्य पर्यवेक्षक अंकुश म्हापलकर यांच्यासोबत प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली.

या पाहणीनंतर केवळ दंड ठोठावून अधिकारी थांबले नाहीत, तर सार्वजनिक रस्त्याची साफसफाईदेखील करून घेतली.

मुंबई महानगर पालिका के पश्चिम विभाग यांच्या कडून कल्पतरू विकासक यांच्या कामगारांकडून रस्त्या स्वच्छ करून घेताना

 

विकासकांच्या मनमानीला पालिकेचा चाप!

मुंबईकरांच्या करातून उभारलेल्या सार्वजनिक रस्त्यांचा वापर बांधकामातील धूळ, माती आणि कचरा पसरवण्यासाठी करायचा आणि त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांनी सहन करायचा, ही मानसिकता आता खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

 

विकासक कितीही मोठा असला, त्याचा प्रकल्प कितीही भव्य असला, तरी सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरण आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी तडजोड केली जाणार नाही, हे के पश्चिम विभागाने दाखवून दिले आहे.

आता इतर विकासकांचे काय?

लोखंडवाल्यात कल्पतरू विकासकावर झालेली ही कारवाई स्वागतार्ह असली, तरी मुंबईकरांसमोर अनेक प्रश्न उभे आहेत.

शहरातील इतर बांधकाम प्रकल्पांमधून रस्त्यांवर पसरणारी धूळ, माती आणि बांधकामाचा कचरा यावरही अशाच प्रकारे कठोर कारवाई होणार का?

केवळ एखाद्या तक्रारीनंतरच अधिकारी जागे होणार, की नियमित पाहणी करून नियम धाब्यावर बसवणाऱ्या विकासकांवर कारवाई केली जाणार?

मुंबईकरांना स्वच्छ रस्ते, प्रदूषणमुक्त परिसर आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था मिळणार तरी कधी?

दंड ठोठावणे ही सुरुवात आहे; नियमांचे पालन करून घेणे ही खरी परीक्षा आहे!

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button