पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
ज्येष्ठ समाजसेविका, अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची वार्ता दुःखदायक आहे. पुणे शहरातील एका रुग्णालयात उपचारादरम्यान ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे दुर्दैवी निधन झाले.
आयुष्यभर अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या त्या महान समाजसेविका होत्या. केंद्र सरकारने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले होते.
महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता.
ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 73 वर्षांच्या होत्या, रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले, पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले, महिना भरापूर्वी त्यांचे हर्निया चे ऑपरेशन झाले होते, त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते, आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांची माय बनलेल्या सिंधुताई यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या आरंभीस केले…
ओळख तिची अनाथांची माय,
प्रेमाला पोरक्या असलेल्या निराधारांची ती माय,
हिमतीसमोर तिच्या तो हरला काळ…
चिंधीची झाली सिंधु , सिंधुची झाली माई,
अशी ओळख तिची, ती #सिंधुताईसपकाळ …..
महाराष्ट्र न्यूज९ कडून #भावपुर्णश्रद्धांजली #



