महाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

धाराशिव येथील पूरग्रस्त शेतकरी यांना* *खासदार रविंद्र वायकर यांनी केली सढळ हस्ते दिला मदतीचा हात*

- *शेतकरी व त्यांच्या कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू व दीपावली निमित्त आर्थिक मदत*

  1. *धाराशिव येथील पूरग्रस्त शेतकरी यांना*
    *खासदार रविंद्र वायकर यांनी केली सढळ हस्ते दिला मदतीचा हात*

– *शेतकरी व त्यांच्या कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू व दीपावली निमित्त आर्थिक मदत*
– *धाराशिव जिल्ह्यातील परांडा, कळंब, आढळ, खडकी, सतरागाव व करंजका आदि गावांचा समावेश. सुमारे १५०० किटचे वाटप*

*मुंबई :*

महाराष्ट्र मधील धाराशिव येथील पूरग्रस्त शेतकरी व कुटुंब यांच्या मदतीसाठी २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र दत्ताराम वायकर यांनी सामाजिक जाणीव लक्षात घेऊन प्रत्यक्ष त्यांच्या गावात जाऊन एक हात पुढे करीत त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील परांडा, कळंब, आढळ, खडकी, सतरागाव व करंजका या व आदी गावातील सुमारे १५०० शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व दीपावली निमित्त आर्थिक मदत केली.

मुसळधार पावसामुळे धाराशिव येथील सुमारे ९७ गावे पुराच्या पाण्याखाली आली होती. या पुरामध्ये शेतकरी यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या शेतात व घरामध्ये पाणी शिरले होते. होते नव्हते ते पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले. याचे वृत्त विविध वृत्तवाहिनीवर पाहिल्यावर वायकर यांनी तात्काळ आपल्या कार्यकर्त्या मार्फत आर्थिक मदत पाठवली.

तेथील पूरग्रस्त शेतकरी यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधत त्यांच्या कुटुंबासाठी लवकरच जीवनावश्यक वस्तू घेऊन येण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार परांडा, कळंब, आढळ, खडकी, सतरागाव व करंजका या गावातील पूरग्रस्त शेतकरी यांची माहिती मिळवत शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या समवेत तब्बल ५ ट्रक जीवनावश्यक ४० गोष्टींचा समावेश असलेल्या वस्तूंचे सुमारे १५०० कीट तयार करून धाराशिव गाठले.

यात अन्नधान्य, कपडे व गैस शेगडी आदी वस्तूंचा समावेश करण्यात आला होता. पुरामुळे सर्वस्वी संसार वाहून गेलेल्या शेतकरी यांच्या कुटुंबांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी खासदार वायकर यांनी प्रति कुटुंबास आर्थिक मदतही केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button