कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया दरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप
५८ वर्षीय महिला एका डोळ्याने झाली दृष्टीहीन .

कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया दरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप
५८ वर्षीय महिला एका डोळ्याने झाली दृष्टीहीन .
मुंबई : आजच्या काळात डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार अतिमहत्त्वाच्या ठरत असते लोक काही झालं डॉक्टर हे प्रथम पर्याय म्हणून पाहतात याला आपण एक मोठा विश्वास म्हणतो कारण एक मानव जीवन स्वस्थ ठेवण्याचे काम हे डॉक्टर मात्र करू शकतात अश्याच विश्वासाने एक वृद्ध ५८ वर्षीय महिला आपल्या डोळ्यांचे मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी डॉ.आर एन कूपर मनपा रुग्णालयात ३१ मे २०२२ रोजी दाखल झाले आणि १ रोजी मोतिबिंदूचा शस्त्रक्रिया झाले काही वेळेनंतर खूप डोळे दुखी सुरू झाले डोळ्याचे पट्टी उघडलं तर काहीच दिसून येत नव्हते असा रुग्ण.रामीला यांनी सांगितले मग दुरऱ्या दिवशी सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टर हे आपसात गांभीर्याने चर्चा सुरू केली.

रूग्ण रामीला यांच्या मुलगा महेश यांनी कूपर डीन डॉ शैलेश मोहिते याच्याकडे धाव घेतली आणि तक्रार केल्यानंतर डीन ने आश्वासन दिलं की “तुमची आई माझी आई ‘ कुठे जाऊ नका म्हणत परत एकदा शस्त्रक्रिया केले गेला पण रुग्णाला काही दिसून येत नाही रुग्णाचे सहपरिवार जाऊन डीनचे भेट घेतल्यानंतर डॉक्टर मोहिते यांनी त्याचं म्हणणे पूर्णपणे बदलून आपले हलगर्जीपणा आणि डॉक्टरांचे चुकी लपवून बोलायला लागले आणि आमच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक झाले नाही म्हणून डीन डॉ.मोहिते यांनी सांगितले या बाबतीत रुग्णाचा मुलगा महेश यांनी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि डीन याचंकडे ही तक्रार नोंदवली अध्याप कारवाई केली गेली नाहीं .

या बाबतीत महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे सचिव भिमेश मुतुला यांना माहिती मिळाली .

या विषयी मुतुला यांनी मुंबई मनपा आयुक्त इक्बाल चहल व कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे आणि जुहू पोलिस ठाणे वरिष्ठ निरीक्षक यांना माहिती देत कूपर डीन डॉ शैलेश व नेत्ररोग्यशास्त्र विभागा विरुध्द वैद्यकीय निष्काळजीपणा कायदा अधिनियम अनुसार चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे विनंती केली आहे .




