बेशुद्ध अवस्थेत सापडलेला इसम उपचारादरम्यान मृत; नातेवाईकांचा शोध सुरू
बी.के.सी. पोलीस ठाण्यात अपमृत्यू नोंद क्रमांक 47/2025 कलम 194 BNSS अंतर्गत करण्यात आली नोंद

बेशुद्ध अवस्थेत सापडलेला इसम उपचारादरम्यान मृत; नातेवाईकांचा शोध सुरू

मुंबई : बीकेसी परिसरातील एशियन हार्ट बस स्टॉप समोरील फुटपाथ, बीकेसी बांद्रा पूर्व मुंबई. येथे 08 नोव्हेंबर 2025 रोजी एक अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत आढळला. माहिती मिळताच बी.के.सी. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि सदर इसमास खाजगी ऍम्ब्युलन्सद्वारे सायन रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सदर इसमास उपचार पूर्व 8 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8.40 वाजता मृत घोषित केले. या घटनेची नोंद बी.के.सी. पोलीस ठाण्यात अपमृत्यू नोंद क्रमांक 47/2025 कलम 194 BNSS अंतर्गत करण्यात आली आहे. त्यानंतर भारत नगर परिसरात सदर इसमाबाबत माहिती काढली असता सदर इसम फुटपाथ वरती कचरा गोळा करीत असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले तसेच सदर मयत इसम हा स्वतःचे नाव मोईन सांगत होता असे समजले आहे. सदर मयत इसमाचे नातेवाईक अद्याप पर्यंत मिळून आले नाहीत.

मृत व्यक्तीचे वर्णन :
नाव.. मोईन
लिंग – पुरुष
बांधा – सडपातळ
चेहरा – उभाट
केस व दाढी – पांढरी
उंची – सुमारे 5 फूट 5 इंच
अंदाजे वय..65 वर्ष
सदर मृत व्यक्तीचे नातेवाईक अद्याप ओळख पटलेले नाहीत. त्यामुळे कोणाला या इसमाबाबत माहिती असल्यास किंवा नातेवाईक असल्यास, त्यांनी त्वरित बी.के.सी. पोलीस ठाणे, मुंबई येथे संपर्क साधावा.
दूरध्वनी : 022-26504481 / 82



