रुपाली चाकणाकर यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा; निष्पक्ष चौकशीसाठी निर्णय
रुपाली चाकणकर यांचा राज्याच्या उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar यांच्याकडे राजीनामा सुपूर्द

रुपाली चाकणाकर यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा; निष्पक्ष चौकशीसाठी निर्णय

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, सध्या अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदू बाबाच्या लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आल्या नंतर सुरू असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तसेच राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar यांच्याकडे सुपूर्द केला.

मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडील काळात विविध माध्यमांतून काही आरोप पुढे येत असून, या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी नैतिक जबाबदारी स्वीकारत हा निर्णय घेण्यात आला आहे. “चौकशीवर कोणताही प्रभाव पडू नये, यासाठी मी स्वेच्छेने पदाचा राजीनामा दिला,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या राजीनाम्याबाबत पुढील निर्णय Sunetra Ajit Pawar घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, या संपूर्ण प्रकरणावर लवकरच सविस्तर भूमिका मांडली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




