Uncategorized

“संत निरंकारी मिशन द्वारा अमृत परियोजनेच्या अंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील ‘स्वच्छ जल-स्वच्छ मन’ स्वच्छता अभियान संपन्न ..!

आंबेगाव तालुक्यातील चिंचोली (कोकणे) & घोडेगाव येथील घोडनदीचा घाट (तिर) निरंकारी स्वयंसेवकांनी केला स्वच्छ..!

*”संत निरंकारी मिशन द्वारा अमृत परियोजनेच्या अंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील ‘स्वच्छ जल-स्वच्छ मन’ स्वच्छता अभियान संपन्न ..!*

आंबेगाव तालुक्यातील चिंचोली (कोकणे) & घोडेगाव येथील घोडनदीचा घाट (तिर) निरंकारी स्वयंसेवकांनी केला स्वच्छ..!

*घोडेगाव (पुणे)*, २३ फेब्रुवारी, २०२४ : निरंकारी *’सदगुरु माता सुदिक्षा जी महाराज’* यांच्या कृपाशीर्वादाने संयुक्त संत निरंकारी मिशन व भारत सरकार संस्कृती मंत्रालय, दिल्ली मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त तीसऱ्या टप्प्यातील ‘अमृत परियोजने’ अंतर्गत *’स्वच्छ जल – स्वच्छ मन’* स्वच्छता अभियान रविवार, दिनांक २३ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत संपन्न झाले. या अभियानाचा शुभारंभ घोडेगाव नगरीचे जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते *मा.श्री.जयसिंग नाना काळे पाटील* यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी संत निरंकारी मिशन घोडेगाव शाखा प्रमुख *मा.श्री.अजित महाराज कोकणे* सह स्वयंसेवकांचे प्रमुख *मा.श्री.दिपकजी कोकणे*, लेखा_जोखा विभाग समन्वयक *श्री.शनेश्वर दरेकरजी, श्री.संतोष बारवेजी, श्री.गोपीनाथ काळेजी, श्री.भगवान डेरेजी* आणि मिशनचे संत/सेवादार महात्मा/भगिनी आदी मान्यवर उपस्थितीत होते.

तसेच या अभियानामध्ये आंबेगाव-जुन्नर तालुक्यातील *घोड नदी सह मीना, कुकडी नदीचा घाट क्षेत्रातील पाण्यात पडलेला प्लास्टिक कचरा, सेंद्रिय कचरा, अपशिष्ट (निरुपयोगी) पदार्थ, अनावश्यक झुडपे, खराब अन्नपदार्थ, जलपर्णी तसेच जलाशयांमध्ये आढळून येणारे शेवाळ जाळीयुक्त काठ्यांचा वापर करुन स्वच्छ* करण्यात आले तसेच चिंचोली (कोकणे) सह घोडेगाव येथील घोड नदीकाठचा *जवळपास ०२ किलोमीटरचा परिसर* स्वच्छ करण्यात आला.

संत निरंकारी मिशन घोडेगाव शाखेचे प्रमुख *श्री अजित महाराज कोकणे* यांनी या परियोजनेविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले की, *ही अमृत परियोजना संपूर्ण भारतदेशात २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ९०० शहरांमध्ये जवळपास १६०० हुन अधिक ठिकाणी राबविण्यात आली.‘अमृत परियोजने’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील घोडनदी, मुळा, मुठा, इंद्रायणी, नीरा, भीमा, कऱ्हा, पवना, कुकडी, मीना, वेळू अशा सर्व नद्यांवरील विविध घाट त्याचबरोबर खडकवासला धरण, नाझरे धरण, कात्रज तलाव, पाषाण तलाव अशा ४२ ठिकाणी हा उपक्रम संपन्न झाला. त्यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच अन्य निरंकारी भक्तगण ६००० हून अधिक संख्येने सहभागी झालेले होते*. ‘जल संरक्षण’ आणि ‘जल बचाव’ करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करुन ते कार्यान्वित करणे हा या परियोजनेचा मुख्य उद्देश होता.

निरंकारी ‘बाबा हरदेव सिंह जी महाराज’ यांनी आपल्या कार्यकालात *समाज कल्याणाचे अनेक उपक्रम राबवले, त्यामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान यांची सुरुवात प्रमुख आहेत. त्यांच्याच शिकवणूकीतून प्रेरणा घेत दरवर्षी विद्यमान ‘सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज’ यांच्या निर्देशनानुसार विविध सामाजिक उपक्रम* राबवले जात असून यावर्षी अमृत परियोजनेचे आयोजन करण्यात आलेले आहे .

या परियोजने अंतर्गत *आज २५ फेब्रुवारी २०२४ रोजी, एकाच दिवशी संपूर्ण भारतभर निरंकारी मिशनच्या सुमारे १.७ लाखहुन अधिक स्वयंसेवकानी समुद्रकिनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहीर, झरे, पाण्याच्या टाक्या, नाले आणि जलप्रवाह इत्यादिंची स्वच्छता केली तसेच जल संरक्षणाची प्रेरणा* दिली. यामध्ये चास, गिरवली, आमोंडी, घोडेगाव, शिंदेवाडी, सालगाव, गंगापूर, चिंचोली सह शिनोली, राजेवाडी व भीमाशंकर भागातील अनेक भक्तजन सहभागी झाले होते.

वरील अभियानाचे नियोजन संत निरंकारी मिशन घोडेगाव शाखेचे प्रमुख *श्री अजित कोकणे* यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते शेवटी त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार देखील मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button