Uncategorized

संतोष परब यांच्या धाडसाला सलाम सीमेवरील जवानांसाठी सलामी 2025 चे आयोजन

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LOC) म्हणजे सीमेवर तैनात असणाऱ्या जिगरबाज जवानांची होणार करमणूक

■ मुक्ता इव्हेंट्स अँड हॉस्पिटॅलिटी प्रा.लि. आयोजित

■ एकता मंच मुंबई आयोजन सहकार्य

■ स्वर्ण स्वर इंटरेटेनमेंट आयोजन सहकार्य

■ शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्था, मुंबई

■ निमना फाऊंडेशन, मुंबई

 

■ सलामी २०२५

■ एक नृत्य संगीतमय सलामी

सीमा सुरक्षा बला करिता

मुंबई – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LOC) म्हणजे सीमेवर तैनात असणाऱ्या जिगरबाज जवानांची करमणूक करण्याची धाडसी संकल्पना आमच्या मनात रुजविण्याचे काम २००२ सालात अप्पांनी म्हणजे सफरसम्राट, दोस्त ए कश्मीर राजा पाटील यांनी केले.या नंतर काही दिवसात राजा पाटलांची मुंबईत हत्या झाली.परंतु नियोजन झालेले असल्याने राजा राणी ट्रॅव्हल आणि आमच्या महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासने याचे संयुक्त रित्या आयोजन केले. खिशात पुरेसे पैसे नसताना ही जिद्दीने आम्ही तो जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवरील सैनिकांच्या मनोरंजनाचा धाडसी दौरा पूर्ण केला.

आणि मी व माझ्या सहकाऱ्यांनी डोक्यात वेड घेतले ते सिमारेषांवरील सैनिकांच्या प्रत्यक्ष मनोरंजनाचे, त्या नंतर आम्ही सीमा सुरक्षा बलाच्या (BSF) कडे वळलो.आजही कोणाला प्रश्न केला की हिंदुस्थानी सीमांचे रक्षण कोण करत ? तेव्हा ९९% लोक उत्तर देतात हे रक्षण भारतीय सेना करते. जेव्हा पासून आम्ही सीमा सुरक्षा बल (BSF) सोबत या संकल्पनेच्या निमित्ताने जोडले गेलो तेव्हा आम्हाला कळले की जेव्हा परकीय आक्रमण होते तेव्हा सर्व प्रथम बॉर्डरचे रक्षण सीमा सुरक्षा बल (BSF) करते आणि आज ही हिंदुस्थानी नागरिकांना हे माहीत नाही.

या सिमारेषांवरील सैनिक करमणुकीच्या ” सलामी ” संकल्पनेच्या निमित्ताने सैनिकांचा दिनक्रम पहाता येतो.त्यांची कडवी सैनिकी शिस्त पहायला मिळते. सैनिकांचा देशा प्रति असलेला आदर त्यांच्या कर्तव्यातून दिसून येतो. घर व कुटुंबापासून दूर राहून प्राणपणाने देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची त्यागी वृत्तीचे जवळून दर्शन खऱ्या अर्थाने या संपूर्ण ” सलामी ” संकल्पनेच्या निमित्ताने घेता येते.या प्रवासात आमची व्यवस्था अधिकारी मेस मध्ये असताना ही आम्ही सर्व पुरुष कलावंतां सहित मुद्दाम सैनिकांच्या बॅराक मध्ये झोपणे पसंत करतो.अर्थात महिला कलावंतांची व्यवस्था तिथल्या शिस्ती प्रमाणे महिला सैनिकांच्या बॅराक मध्ये असते.सकाळच्या कडाक्याच्या थंडीत केलेली अर्धवट अंघोळ, सैनिकांनी बनवलेल्या नाश्त्याचा आस्वाद, पुन्हा पुढच्या ठिकाणचा शेकडो कि.मी. चा प्रवास आणि दुपारी पुन्हा सैनिकांसोबत जेवण आणि स्वतः ची जेवणाची ताट स्वतः घासणे, कॅम्प मधला अधिकाऱ्यांसोबतचा फेरफटका, सैनिकी सेवेबद्दलचे आकर्षण, संध्याकाळी कडक गणवेशातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत सैनिकांनी बनवलेली कांदाभजी व चहाचा आस्वाद घेऊन ” सलामी ” या सैनिक करमणूक संकल्पनेतील धमाल प्रयोग आणि सैनिकांनी केलेली उत्स्फूर्त नृत्ये,त्यांनी गायलेली सुरातली गाणी, त्यांच्या प्रतिक्रिया, इतर भाषिक सैनिकांसोबत मराठी सैनिक जेव्हा आपुलकीने भेटायला येतात तेव्हा या सर्व गोष्टीनी मन भरून येत.

हि सगळी दुर्मिळ भावनिकता अनुभवण्याची संधी आणि त्या मागची प्रेरणा असलेले मुंबई व महाराष्ट्रातील अनेक मान्यवर, आम्हाला आणि आमच्या या उपक्रमाला आपल्या लेखणीतून प्रेरणा देणारे सर्व पत्रकार मित्र यांचे आणि या सर्वांच्या निस्वार्थी सहकार्याचे माझ्या सहित प्रत्येक कलावंत आभारच मानतो.

मुक्ता इव्हेंट अँड हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. यांच्या आयोजनातून या वर्षी ” सलामी ” हा उपक्रम १ ते १२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ४८ कलावंत व तंत्रज्ञ यांच्या सोबत राजस्थान राज्यातील जोधपूर, पोकरण, जैसलमेर, ब्रम्हसर, रामगढ, बबलीयानवाला, खाजूवाला, सांचू, बिकानेर या सीमावर्ती भागातील सीमा सुरक्षा बल (BSF) च्या जवान व त्यांच्या कुटुंबीयांच्या करमणुकी करीता संपन्न होणार आहे.

या दोन्ही संकल्पना यशस्वी होण्यासाठी किसन जाधव, नाना आंबोले, अशोक सावंत, बाळा खोपडे, प्रदीप कडू, डॉ सुनिल हळूरकर, निखिल जाधव, डॉ. जितेंद्र जाधव, डॉ शर्मिला जाधव, डॉ आर. अजिथ, विवेक देशपांडे, राजेश खोमणे, श्रीरंग आरस, मनोहर गोलांबरे, मारुती खुळे, डॉ स्मिता डोंगरे, महादेव खैरमोडे, रजनीश राणे, नंदकुमार पाटील, सुनिल चव्हाण, डॉ शाम नाबर, सिद्धार्थ तांबे, सायली परब, सुनिल मेहेतर, अनुप सुर्वे, मेघश्याम दिघोळे, ऍड तुषार काळे, केतन सरगे, जमील सिद्धीकी, सायली परब, समर्थ परब, उज्वला अबनावे, ही मंडळी कार्यरत आहेत

या संपूर्ण उपक्रमास प्रसिद्ध गायिका माधुरी नारकर यांच्या स्वर्णस्वर फाऊंडेशन (नियोजित), अविराज पवार यांच्या शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्था, नितीन मधुकर नांदगावकर यांची निमना फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे. एकता मंचचे अध्यक्ष प्रिं अजय कौल यांच्या विशेष सहकार्यातून संपन्न होतं असलेल्या संकल्पनेसाठी कोमल दळवी व दिपमाला लादे या संकल्पना नियंत्रक असून या राष्ट्रीय स्तरावरील संपूर्ण संकल्पनेचे नियोजन प्रशांत काशीद यांचे असून धाडसी उपक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन व आयोजन संतोष परब यांनी केले आहे. हे या उपक्रमाचे २३ वे वर्ष आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button