के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले उतरले रस्त्यावर; भर उन्हात रस्ता रुंदीकरण कामाची पाहणी
सहाय्यक अभियंता महाले यांच्यासह विकासकामांचा घेतला आढावा अंधेरी पश्चिममध्ये वेगाने सुरू रस्ता रुंदीकरण मोहीम

के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले उतरले रस्त्यावर; भर उन्हात रस्ता रुंदीकरण कामाची पाहणी
मुंबई : अंधेरी पश्चिम परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नागरिकांना अधिक सुसज्ज रस्ते सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण कामांची के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी केली. यावेळी त्यांनी परिरक्षण विभागाचे सहाय्यक अभियंता महाले यांच्यासह विविध कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

भर उन्हात सुरू असलेल्या या पाहणीदरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या कामाची गुणवत्ता, प्रगती आणि नागरिकांना होणारा त्रास कमीत कमी ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने रस्ते रुंद करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या कार्यकाळात अंधेरी पश्चिम विभागात मोठ्या प्रमाणावर रस्ता रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातील सिझर रोड ते वीरा देसाई रोड, व रमेश नगर येथील रस्ता रुंदीकरण पूर्ण देखील झाले असून इतर ठिकाणची अनेक वर्षांपासून रखडलेली कामे मार्गी लागत असून त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, रस्ता रुंदीकरणामुळे भविष्यात वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच विकासकामांवर स्वतः लक्ष ठेवून अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून पाहणी केल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीचेही कौतुक होत आहे.
चक्रपाणी अल्ले यांनी पाहणीदरम्यान संबंधित विभागांना कामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत विकासकामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


