आमची मुंबईगुन्हेदिंडोशी विधानसभामहाराष्ट्रविशेषसामाजिक

“ड्रग्स मुक्त दिंडोशी — भाजपा ची वचनबद्धता!” दिंडोशीत ड्रग्स माफियां विरोधात कडक इशारा; ठोस कारवाई न झाल्यास भाजपा आंदोलनाच्या तयारीत

ड्रग्स माफियां विरोधात निर्णायक लढा दिंडोशी विधानसभा क्षेत्रात भगवा धारी आंदोलन छेडून रस्त्यावर उतरणार

 

मुंबई | प्रतिनिधी

झोन-12 चे डीसीपी श्री महेश चिमटे यांनी दिंडोशी विधानसभा क्षेत्रात वाढत चाललेल्या ड्रग्स माफियांच्या कारवायांविरोधात कडक शब्दांत निवेदन सादर करत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.

दिंडोशी परिसरात पसरलेल्या ड्रग्सच्या घातक जाळ्यामुळे युवकांचे भविष्य धोक्यात येत असल्याची गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर संबंधित माफियांवर तात्काळ कठोर कारवाई करून त्यांचे संपूर्ण उच्चाटन करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.

 

“ड्रग्स माफियांना कोणतीही सूट नाही, थेट कारवाईच!” असा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला.

यावेळी प्रशासनाला इशारा देताना सांगण्यात आले की, जर तात्काळ ठोस आणि परिणामकारक पावले उचलली नाहीत, तर भारतीय जनता पार्टी दिंडोशी विधानसभा क्षेत्रात भगवा धारी आंदोलन छेडून रस्त्यावर उतरेल आणि ड्रग्स माफियांविरोधात निर्णायक लढा उभारेल.

“जनतेच्या सुरक्षेसाठी भाजपा सदैव सज्ज आहे,” असे ठामपणे अधोरेखित करण्यात आले.

 

📍 यावेळी उपस्थित मान्यवर:

श्री सुधीर राऊत (जिल्हा महामंत्री),

श्री कमलेश शुक्ला (जिल्हा कोषाध्यक्ष),

ॲड. विकास सिंग गोर (जिल्हा कार्यकारिणी सदस्य),

श्री दिवाकर कामत (जिल्हा कार्यकारिणी),

श्री राजकुमार पांडे (मंडळ अध्यक्ष – तानाजी नगर),

श्री युवराज बनसोडे (अध्यक्ष – त्रिवेणी नगर मंडळ),

सौ. कविता सालियार (अध्यक्ष – नागरी निवारा मंडळ),

श्री महेंद्र झगडे (अध्यक्ष – आरे मंडळ),

श्री ग्रिजेश सिंह (जिल्हा सोशल मीडिया प्रमुख),

श्री संतोष लांडगे (मंडळ उपाध्यक्ष)

 

🚩 “ड्रग्स मुक्त दिंडोशी — भाजपा ची वचनबद्धता!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button