आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पश्चिम बंगाल–सिक्किम प्रांतात पार पडली

निस्वार्थ सेवा, समाजहितासाठी समर्पण यानुसार कार्य करणारी ही संस्था - सुनिल जैन खाबिया

अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पश्चिम बंगाल–सिक्किम प्रांतात पार पडली.

अखिल भारतीय मारवाडी युवा मंच या देशभर व विदेशात कार्यरत असलेल्या शिखर सामाजिक संस्थेची राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची द्वितीय बैठक राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगाल – सिक्किम प्रांतात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीचे दालकोला शाखेकडून यशस्वी आयोजन करण्यात आले.

 

सदर राष्ट्रीय बैठकीला माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक श्री सुनिल जैन खाबिया हे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून उपस्थित होते. त्यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करून बैठकीला विशेष दिशा दिली. आपल्या प्रभावी मार्गदर्शनातून केवळ संस्थेच्या कामकाजावर प्रकाश टाकला, तसेच नवीन पिढीला योग्य दिशा देणारे नेतृत्व कसे असावे याबाबतही महत्त्वाचे विचार मांडले. अखिल भारतीय मारवाडी युवा मंच ही समाजातील शिखर संस्था असून, देशभरातील विविध प्रांतात तसेच विदेशातही आपली सामाजिक सेवा कार्ये सातत्याने करत आहे. निस्वार्थ सेवा, समाजहितासाठी समर्पण यानुसार कार्य करणारी ही संस्था गोरगरीब व वंचितसाठी काम करत आहे.

सदर बैठकीला महाराष्ट्र प्रांतातून प्रांतीय अध्यक्षा श्रीम. अमृता भुतडा, माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री रामकिशोर वर्मा, माजी प्रांतीय अध्यक्ष श्री उमेश पंचारिया, स्थायी निमंत्रित सदस्य श्रीम. सुप्रिया सुराणा, राष्ट्रीय संयोजक श्रीम. पूनम बाल्दी इ. युवा सदस्य उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button