अंधेरी–विलेपार्ले परिसरातील झोपडपट्ट्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद – हजारो लोकांनी सोडली व्यसनांची वाट**
**ब्रम्हकुमारी मिशनचे नशामुक्ती अभियान ठरले आदर्श अभियान**

**नशामुक्ती अभियान ठरले आदर्श अभियान**
अंधेरी–विलेपार्ले परिसरातील झोपडपट्ट्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद – हजारो लोकांनी सोडली व्यसनांची वाट**
मुंबई : ब्रह्माकुमारी विलेपार्ले केंद्र आयोजित नशामुक्ती अभियान यावर्षी उपनगरांमध्ये चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे. ४० शाळा–महाविद्यालये आणि तब्बल ८० विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने समाजातील त्या घटकांपर्यंत पोहोच साधली, जिथे नशेची समस्या सर्वाधिक जाणवत होती. अभियानाची सुरुवात विलेपार्ले केंद्रात ब्रह्मकुमारी संचालिका बी.के. योगिनी दीदी यांच्या पावन उपस्थितीत झाली.
उद्घाटन सोहळ्यात जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडचे संस्थापक व CMD जगदीश कुमार एम. गुप्ता, शिवसेना विधानसभा समन्वयक सुनिल जैन खाबिया, तसेच अंशुला दीदी, दीपा दीदी, तपस्विनी दीदी, प्रतिभा दीदी, हर्षा दीदी आणि अनेक ब्रह्मकुमारी सेवाभावी भावंडांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित नागरिक आणि कामगारांनी सामूहिकरीत्या नशा त्यागाचा संकल्प केला.
झोपडपट्टी भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद

अभियानादरम्यान अंधेरी–विलेपार्ले परिसरातील नेहरू नगर, मोरागांव, गिल्बर्ट हिल, जे.बी. नगर, चकाला, अंधेरी (पूर्व–पश्चिम), विलेपार्ले (पूर्व) आणि जुहू चौपाटी परिसरातील आश्रित वस्तींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. स्थानिक रहिवासी, कामगार, विद्यार्थी, महिला आणि स्थलांतरित कुटुंबांनी विविध कार्यक्रमांना मोठ्या संख्येने हजेरी लावली.

स्वयंसेवकांच्या मते, नशेच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या अनेक कुटुंबांसाठी हे अभियान एक आशेचा किरण ठरले.
हजारो लोकांची नशामुक्तीची सुरुवात
गेल्या १५ दिवसांत हजारो जणांनी नशामुक्ती औषध घेतले असून त्यांनी नशा सोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर रोजी जुहू चौपाटीवर आयोजित विशेष शिबिरात ५०० हून अधिक नागरिकांनी औषध घेऊन त्वरित नशा सोडण्याचा संकल्प केला. काही पोलीस अधिकारीही या उपक्रमात सहभागी झाले व त्यांनी ब्रह्मकुमारींच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
समाजामध्ये सकारात्मक बदल
अभियानामुळे अनेक कुटुंबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत आहेत.
नशा सोडलेल्या व्यक्तींमुळे घरांची आर्थिक परिस्थिती सुधारली, कौटुंबिक तणाव कमी झाला, तर आरोग्यातही मोठी सुधारणा दिसून आली.
युवकांमध्ये नशा त्यागाबद्दल जागरूकता वाढताना दिसत आहे.
नेहरू नगर व मोरागांवसारख्या परिसरांतील रहिवाशांनी सांगितले की, इतक्या व्यापक पद्धतीने आणि सातत्याने राबवलेले अभियान त्यांनी पहिल्यांदाच पाहिले.

मान्यवरांचा सहभाग
अभियानाला अनेक मान्यवरांनी थेट भेट देऊन समर्थन दिले. यात—
सांसद रविंद्र वायकर
अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम
विलेपार्लेचे आमदार पराग अळवणी
अंधेरी पूर्वचे आमदार मुरजी पटेल
शिवसेना विभागप्रमुख राजू पेडणेकर
अभिनेता टायगर श्रॉफ
या सर्वांनी ब्रह्मकुमारींच्या प्रयत्नांचे कौतुक करत नशामुक्त समाजनिर्मितीला महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे सांगितले.

तसेच विलेपार्ले पूर्व विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम, डी.एन. नगर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कल्पना गाढेकर, जुहू पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, एम. ए. हायस्कूलच्या प्राचार्या शेर्ली पॉल आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी अमूल्य सहकार्य दिले.

नशामुक्त समाजाकडे मोठी वाटचाल
ब्रह्मकुमारी विलेपार्ले केंद्राचे हे अभियान आता एक सामाजिक आंदोलन म्हणून उभे राहत आहे.
यामुळे नशेमुक्तीबाबत केवळ जनजागृतीच वाढली नाही, तर हजारो कुटुंबांना आरोग्यदायी, सुरक्षित आणि सुस्थितीच्या भविष्याची दिशा मिळाली आहे.
ही पुढाकार भविष्यात नशामुक्त समाज निर्मितीच्या दिशेने नक्कीच महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे



