आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईराजकीय बातमी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पश्चिम उपनगर सचिव अल्ताफ खान यांनी मनसेला ठोकला रामराम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पश्चिम उपनगर सचिव अल्ताफ खान यांनी मनसेला ठोकला रामराम

मुंबई महानगर पालिका निवडणूक आधी मनसेला जोरदार झटका बसला आहे. वर्सोवा विधानसभा मध्ये कार्यरत असलेले मनसेचे पश्चिम उपनगर सचिव अल्ताफ खान यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ जून रोजी काढलेले पत्रक यामुळे नाराज होत आपण पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र खुद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवले आहे. अल्ताफ खान यांनी मनसे सोडताना आपल्याला आलेल्या कटू अनुभव सांगत गुढी पाडव्याच्या सभेनंतर कोणते कोणते प्रसंग घडले त्याच्या पाढाच वाचला आहे . मनसेच्या मशिद वरील भोंग्याला झालेला मनसे मधुन हा पहिलाच विरोध नसून या आधी देखील मनसेचे फायर ब्रँड नेते वसंत तात्या मोरे हे मस्जिदवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून नाराज होते.

अल्ताफ खान यांनी मनसे सोडताना पक्षाच्या निर्णयामुळे त्यांच्या सोबत काय काय घडले हे त्यांनी पत्रात सविस्तर नमूद केले आहे आणि विशेष म्हणजे अल्ताफ खान यांनी आपला राजीनामा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत दिला आहे. आता येणाऱ्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अल्ताफ खान कोणता झेंडा हातात घेतात हे पाहणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button