आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईवर्सोवा विधानसभाविशेषसामाजिक

गणेश विसर्जना निमित्त वर्सोवा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष यादव यांनी केले मोफत बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या वाटप

मुंबई युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या हस्ते झाले मोफत बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या वाटप

मुंबई – अनंत चतुर्थी निमित्ताने वर्सोवा परिसरात गणेश विसर्जनाचा उत्साह मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना, भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी काँग्रेस पक्षाच्या वर्सोवा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष यादव यांनी एक प्रशंसनीय उपक्रम राबवला.

मुंबई युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या वाटप झाले. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला हजारो गणेशभक्त उपस्थित असताना, उष्ण वातावरणामुळे अनेकांना तहान व थकवा जाणवत होता. ही बाब लक्षात घेऊन संतोष यादव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोफत बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या वाटप करून भाविकांची सेवा केली.

या सेवाभावी उपक्रमामुळे गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्टॉल्स उभारून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना पाणी व खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले.

स्थानिक नागरिक आणि भाविकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. संतोष यादव यांनी सांगितले की,“गणरायाच्या विसर्जनावेळी भक्तांची काळजी घेणे हीच खरी सेवा आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी मनापासून सहभाग घेतला. भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम राबवत राहू.”या उपक्रमामुळे वर्सोवा युवक काँग्रेसने सामाजिक बांधिलकीची जाणीव पुन्हा अधोरेखित केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button