संजय मानाजी कदम यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात स्तुत्य उपक्रम
वाढदिवसाचे औचित्य साधत विविध जिल्ह्यांतील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

संजय मानाजी कदम यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात असलेल्या प्राथमिक शाळा, उमरा येथे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. शिक्षणाच्या वाटेवर चालणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद या उपक्रमाचे खरे यश ठरले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, उपस्थित गावकरी तसेच सर्व विद्यार्थ्यांकडून संजय मानाजी कदम यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. समाजासाठी काहीतरी देण्याची भावना जपत वाढदिवस साजरा करण्याची त्यांची ही पद्धत सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

अंधेरी पश्चिम येथील रहिवासी गरजू व्यक्ती, विद्यार्थी व लघु व्यावसायिकांसाठी सातत्याने कार्यरत असलेले संजय मानाजी कदम हे समाजसेवेचे एक विश्वासार्ह नाव आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत, संकटग्रस्त कुटुंबांना आधार, तसेच गरजू घटकांसाठी मदतीचा हात देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.
सामाजिक व धार्मिक उपक्रमांसोबतच महिला सक्षमीकरण, विद्यार्थी मार्गदर्शन आणि शैक्षणिक प्रोत्साहन यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या विश्वासातून त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध जिल्ह्यांतील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबवला आहे.
लातूर, परभणी, हिंगोली तसेच रायगड जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत “वाढदिवस म्हणजे स्वतःपुरता आनंद न ठेवता समाजासाठी काहीतरी देण्याची संधी” हा संदेश त्यांनी कृतीतून दिला आहे. संजय मानाजी कदम यांचे हे कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न असून, अनेक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्याचे कौतुक केले जात आहे.

जागृत महाराष्ट्र न्यूज पालम, परभणी




