मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांची भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष Nitin Nabin यांना सदिच्छा भेट; मुंबई विकासावर चर्चा
आमदार अमीत साटम यांनी Nitin Nabin यांना ‘उडान’ पुस्तक भेट देत संघटनात्मक विषयांवर केली चर्चा

मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार Ameet Satam यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष Nitin Nabin यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पक्षाच्या विविध संघटनात्मक विषयांवर तसेच मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच येणाऱ्या काळात Bharatiya Janata Party च्या माध्यमातून आणि मुंबई महानगरपालिकेच्या कार्यातून मुंबईकरांची अधिक प्रभावी सेवा कशी करता येईल, याबाबतही सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.

या प्रसंगी आमदार अमीत साटम यांनी स्वतः लिहिलेले “उडान” हे पुस्तक Nitin Nabin यांना सप्रेम भेट म्हणून प्रदान केले. त्यांच्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असून, त्यांचे नेतृत्व संघटनासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




