आमची मुंबईमहाराष्ट्रविशेषसामाजिक

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या पहिल्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुमान शेखर मुंदडा यांना मिळाला

महाराष्ट्र गो सेवा आयोगाच्या पहिल्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची निवड झाली असून महाराष्ट्र राज्यात प्रथमच स्थापित झालेल्या महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे प्रथम अध्यक्ष होण्याचा मान शेखर मुंदडा यांना मिळाला आहे.

यशा मागे मागील अनेक वर्षे समजासाठी व गो माते बद्दल त्यांनी केलेलं कार्य याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रभरातील अडीच हजार पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्थांचे जाळे व आतापर्यंत हजारो निष्पाप गाईंचे कसयांपासून प्राण वाचवण्यात देखील राज्यात शेखर मुंदडा यांची खूप मोठी व महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्षपदी निवड झाल्याने आज महाराष्ट्रातला प्रत्येक गोरक्षक व गोभक्त यासोबतच हजारो भाकड गाई सांभाळणाऱ्या गोशाळा प्रतिनिधी देखील सुखावाले आहेत.

महा एनजीओ फेडरेशन चे संचालक अमोल उंबरजे म्हणाले की, जनसामान्यांचा नेता म्हणून ओळख असलेले शेखर मुंदडा यांची निवड झाल्यामुळे सामाजिक व गोरक्षक हे खूपच आनंदित झाले आहेत तसेच आता शासन दरबारी सामाजिक व गोरक्षकांच्या अडचणी सहजतेने सोडविण्यात येतील.
शेखर भाऊंची अध्यक्षपदी निवड झाल्याने जणू आपणच त्या पदाला गवसणी घातली आहे अशी हजारो स्वयंसेवी सामाजिक प्रतिनिधी यांची जनभावना आहे . समाजाला सहज उपलब्ध असणारे जनसामान्यांच्या नेतृत्वाच्या कार्यकर्तृत्वावर महाराष्ट्र शासनाने लावलेली ही सुवर्णमोहर आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यासोबतच या संपूर्ण प्रक्रियेत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे देखील आम्ही आभार मानतो.

अमोल उंबरजे, संचालक : महा एनजीओ फेडरेशन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button