मुंबई महानगर पालिका के पश्चिम विभाग मधील अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी राजन गावडे अँक्शन मोड मध्ये
अंधेरी पश्चिम जे पी रोड वरील फेरीवाले यांच्यावर डी एन नगर पोलिस अधिकारी यांना घेऊन केली धडक कारवाई

मुंबई महानगर पालिका के पश्चिम विभाग मधील अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी राजन गावडे अँक्शन मोड मध्ये
अंधेरी पश्चिम जे पी रोड वरील फेरीवाले यांच्यावर डी एन नगर पोलिस अधिकारी यांना घेऊन केली धडक कारवाई

मुंबई महानगर पालिका हद्दीतील वाढते फेरीवाले अतिक्रमण निर्मूलन विभाग यांची डोकेदुखी ठरत असली तरी देखिल मुंबई महानगर पालिका के पश्चिम विभाग मधील अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी राजन गावडे साहेब आपल्या के पश्चिम विभाग मधील अवैध फेरीवाले यांच्यावर कारवाईचा बडगा उगारतच असतात. के पश्चिम विभाग मधील जे पी रोड वर मोठ्या प्रमाणात फेरीवाले फूटपाथ व रस्त्यावरच आपला पसारा मांडून वाहतुकीला व सामान्य मुंबईकर यांना चालण्यासाठी अडथळा निर्माण करत असतात.

के पश्चिम विभाग अतिक्रमण निर्मूलन विभाग यांनी डी एन नगर चे स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची मदत घेउन जे पी रोड वर रस्त्यावर व फूटपाथ वर ठाण मांडून बसलेल्या अवैध फेरीवाला यांच्यावर कारवाई केली

के पश्चिम विभाग अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी व डी एन नगर पोलिस स्टेशन चे अधिकारी फेरीवाला विरोधात कारवाई करताना
फेरीवाला विरोधात कारवाई करताना मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होत असुन त्याचा फटका व नुकसान मुंबईकर यांना होत असल्याच लक्षात येते. त्यामुळे अधिकारी वर्ग सावध पाऊल उचलत जिथे मुंबईकर यांना त्रास जिथे अंधेरीकर यांना त्रास होणार तिथे कारवाई कारवाई होणारच या पवित्र्यात असल्याचे दिसून आले




