आपली मुंबईमुंबईसामाजिक
Trending

वर्सोवा विधानसभा आमदार डॉ भारतीताई लव्हेकर यांच्या “ती फाउंडेशन” चा सहावा वर्धापन दिन साजरा 

वर्सोवा विधानसभा आमदार डॉ भारतीताई लव्हेकर यांच्या “ती फाउंडेशन” चा सहावा वर्धापन दिन साजरा 

२८ मे जागतीक मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणजेच World Menstrual Hygiene Day निम्मित डॉ भारतीताई लव्हेकर यांचा “वॉक फॉर कॉज” उपक्रम 

 २८ मे जागतीक मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणजेच World Menstrual Hygiene Day म्हणून ओळखला जातो. मासिक पाळीबद्दल असलेले समज गैरसमज दूर व्हावेत, यासाठी वर्सोवा विधानसभा आमदार व “ती फाउंडेशन” संस्थपिका डॉ भारतीताई लव्हेकर यांच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात शाळकरी मुली, चित्रपट क्षेत्रातील कलाकर व स्थानिक महिलांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला.

ती फाउंडेशन चा सहावा वर्धापन दिवस व जागतीक मासिक पाळी स्वच्छता दिना निमित्त केले कार्यक्रमांचे आयोजन सॅनिटरी पॅड बँके’चा सहावा वर्धापन देखिल केक कापून साजरा करण्यात आला .आजच्या एकवीसव्याशतकात देखील मासिक पाळीबद्दल मोकळेपणाने बोलले जात महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप सर्वच स्तरावर होताना दिसत नाही.

याच पार्श्वभूमीवर  ती फाउंडेशन संस्थापिका/ वर्सोवा विधानसभा आमदार डॉ भारतीताई लव्हेकर यांच्या वतीने “ब्रेक द टॅब्बू” या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मासिक पाळी बाबत असलेले समज आणि गैरसमज दूर करण्यासाठी विविध समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असतात. परंतु आमदार डॉ भारतीताई लव्हेकर यांनी आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील जोगेश्वरी पश्चिम एस वी रोड दिल्ली दरबाार हॉटेल वरील एफएम बँकविट हॉल मध्ये केले होते . जागतिक मासिक पाळी स्वच्छतादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तब्बल १००० महिलांनी आपला सहभाग नोंदविला.

स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांच्या ‘ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँके’चा ६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वॉक फॉर द कॉजमध्ये विविध महिलांनी ‘खुलकर ‘बोलो’, ‘ब्रेक द टॅबू’, ‘वी आर ‘कमिटेड’चे फलक हातात घेऊन आमदार डॉ भारतीताई लव्हेकर यांच्या सोबत रॅम्प वॉक देखील केला. 

वर्सोवा विधानसभा आमदार डॉ भारतीताई लव्हेकर यांच्या”ती फाउंडेशन” डिजिटल सॅनिटरी पॅड बँकेच्या कामाची दखल खुद राष्ट्रपती यांनी देखील घेतली होती त्यांच्या कामामुळे २०१८ साली राष्ट्रपतींच्या हस्ते ‘फर्स्ट लेडी अवॉर्ड सन्मान’ मिळाला होता. “ती फाउंडेशन” ११८ शाळांशी जोडली गेली असून, अनेक आदिवासी पाड्यांमध्ये काम करत असल्याची माहिती डॉ. भारतीताई लव्हेकर यांनी कार्यक्रमादरम्यान दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मासिक पाळी स्वच्छतेसंदर्भात ती फाउंडेशनने तयार केलेली डॉक्युमेंट्री फिल्म दाखवण्यात आली.

यावेळी भाजप नेते तरुण राठी, अभिनेते तेज सप्रू, अभिनेत्री प्रीती सप्रू अभिनेता अली अजगर, अभिनेत्री अचल चव्हाण, गायक शाहिद मालिया, यांच्यासह बिझनेस वुमन, डॉक्टर, वकील, सीए, फॅशन डिझायनर, पायलट, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, सफाई कामगार, घरकामगार महिला, कोळी महिला, शाळकरी मुली, व मोठ्य  प्रमाणत विधानसभा क्षेत्रातील स्थानिक महिलांनी आपला सहभाग नोंदवला 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button