अंधेरी पश्चिमआमची मुंबईके पश्चिम विभागमहाराष्ट्रमुंबईमुंबई चे रस्तेविशेषसामाजिक

खासदार ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांना कौतुकाचे शब्द

इर्ला मार्गावरून जाताना मला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही - हेमा मालिनी

खासदार ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांना कौतुकाचे शब्द

 

मुंबई : ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांनी अंधेरी पश्चिमचे आमदार तसेच मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या कामाचे मनापासून कौतुक केले आहे.

इरला परिसरातून प्रवास करताना झालेला सकारात्मक बदल पाहून त्या आश्चर्यचकित झाल्याचे त्यांनी सांगितले. “आज इर्ला मार्गावरून जाताना मला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. फुटपाथवरील सर्व अतिक्रमणे हटवलेली दिसली, दुकानांच्या काचा स्पष्ट दिसत होत्या आणि नागरिक आनंदाने पदपथांचा वापर करत होते. इर्ला परिसर पूर्णपणे बदललेला जाणवला,” असे त्यांनी नमूद केले.

हा बदल अंधेरी पश्चिम विधानसभा आमदार मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या कटिबद्ध प्रयत्नांमुळे शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमीत साटम यांची नुकतीच मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले.

“ही स्वच्छता मोहीम पुढेही कायम राहावी,” अशी अपेक्षा व्यक्त करत हेमा मालिनी यांनी परिसराच्या सुशोभीकरणासाठी सातत्य राखण्याचे आवाहन केले.

https://www.facebook.com/share/p/1Kj8vXx8Qi/

इर्ला परिसरातील अतिक्रमणविरोधी कारवाईनंतर नागरिकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत असून, स्वच्छ आणि मोकळे पदपथ हे शिस्तबद्ध शहरव्यवस्थेचे लक्षण असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून उमटत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button