डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण भूमिला राजघाटाचा दर्जा द्या

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण भूमिला राजघाटाचा दर्जा द्या”
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिल्ली येथे झाले होते. या पार्श्वभूमीवर तेथील महापरिनिर्वाण भूमीला राजघाटसारखा दर्जा मिळावा अशी मागणी डॉ. आंबेडकर परिनिर्वाण भूमी सन्मान कार्यक्रम समितीने केला आहे.
दिल्ली येथील अलिपूर रोड येथे बाबासाहेबांचे स्मारक तयार करण्यात आले आहे. परंतु परिनिर्वाण भूमी शेजारी शासकीय आणि निमशासकीय बंगल्याचे अधिग्रहण करून स्मारक परिसरात वाढ करणे, स्मारकाला जागतिक वारसा पर्यटनस्थळाच्या यादीत समाविष्ट करणे, या मागण्या प्रलंबित आहेत. त्यासंदर्भात १३ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन आझाद मैदान येथे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक आणि पत्रकार परिषदेचे आयोजन डॉ. शांताराम कारंडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी केले असून या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले, पुर्व कैबीनेट मंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. इन्द्रेश गजभिये आणि माजी समाजकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य श्री. बबनराव घोलप पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
१५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले साहेब यांच्या निवासस्थानी होणार असून आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती डॉ. आंबेडकर परिनिर्वाण भूमी सम्मान कार्यक्रम समिती चे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. जगदीश लाड यांनी दिली. अधिक माहिती साठी संपर्क जगदीश लाड
9920554039
प्रदेश सचिव, महाराष्ट्र राज्य
डॉ. आंबेडकर परिनिर्वाण भूमी सम्मान कार्यक्रम समिती (रजि)



