राजे शिवाजी प्रीमियर लीग २०२५ : ‘राजे शिवाजी वोरियर्स’ संघ विजेता, ‘लायन्स बॉईज’ उपविजेता

राजे शिवाजी प्रीमियर लीग २०२५ : ‘राजे शिवाजी वोरियर्स’ संघ विजेता, ‘लायन्स बॉईज’ उपविजेता
कुर्ला पश्चिम कमानी सुंदरबाग येथील राजे शिवाजी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित राजे शिवाजी प्रीमियर लीग २०२५ (RSPL 2025) या बॉक्स क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत राजे बॉईज, मराठा वोरियर्स, चिंतामणी बॉईज, राजे शिवाजी वोरियर्स, लायन्स बॉईज, फायटर 70 से, आणि चारली बॉईज अशा एकूण सात संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा विजेतेपद ‘राजे शिवाजी वोरियर्स’ संघाने पटकावले, तर ‘लायन्स बॉईज’ संघ उपविजेता ठरला. तसेच लहान मुलांसाठी आयोजीत स्पर्धेत ‘चिंता टायगर्स’ संघाने प्रथम क्रमांक पटकावला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अपना फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष परेश चौधरी, डॉ. डीएन महाजन, माजी नगरसेवक हरिष भांदिर्गे, शिवसेना शाखाप्रमुख साईनाथ कटके, जेष्ठ आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, संस्थापक भाई साखरकर, सेक्रेटरी राकेश व्हटकर, खजिनदार अजय गावकर, उपाध्यक्ष प्रशांत गायकर, उपसेक्रेटरी प्रसाद अनसुरकर, तसेच मंडळाचे सभासद संतोष दरवेश, वैभव खोपकर, विनायक साखरकर, प्रवीण धुरी, प्रणय राणे, रुणाल इंचले व प्रितेश विणेरकर यांनी विशेष मेहनत घेतली.



