एकता मंच तर्फे आयोजित आरोग्य आणि कर्करोग (कॅन्सर) संबंधित मोफत वैद्यकीय शिबिर
शिक्षण महर्षी प्राचार्य अजय कौल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महा आरोग्य शिबिराचे आयोजन

एकता मंच तर्फे आयोजित आरोग्य आणि कर्करोग (कॅन्सर) संबंधित मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात येणार असून या शिबिराचे उद्दिष्ट समाजात आरोग्य जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना आवश्यक वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून देणे आहे. हे शिबिर 14 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 वाजता ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत यारी रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम) येथील चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराचे आयोजन शिक्षण महर्षी प्राचार्य अजय कौल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महा आरोग्य शिबिराचे आयोजन होत असून
या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना खालील सुविधा मोफत दिल्या जातील:
सामान्य आरोग्य तपासणी आणि औषधांचे मोफत वितरण
डोळ्यांची तपासणी आणि चश्म्यांचे मोफत वितरण
रक्तगट तपासणी (ब्लड ग्रुप) आणि पूर्ण रक्त तपासणी
गठिया, मणक्याच्या समस्या आणि हाडांची घनता तपासणी
मूत्रपिंड आणि प्रोस्टेट संबंधित तपासणी
महिलांच्या आरोग्याशी संबंधित रोगांची तपासणी
फुप्फुस आणि श्वसन समस्यांची तपासणी
बालकांशी संबंधित रोगांची तपासणी
कान, नाक आणि गळ्याची तपासणी
आयुर्वेदिक औषध व उपचार
युनानी औषध व उपचार
वरिकोज नसांची तपासणी
कॅन्सरची तपासणी
दंत चिकित्सा व दातांची तपासणी
ईसीजी (ECG) चाचणी
विशेषज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार असून आरोग्य समस्या तपासण्यासाठी सर्व सेवा पूर्णतः मोफत असतील. या उपक्रमाचा उद्देश लोकांना त्यांच्या आरोग्यासाठी जागरूक करणे आणि योग्य उपचार वेळेवर मिळवून देणे आहे.
या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी सर्वांना आमंत्रित करण्यात येते.
अधिक माहितीसाठी संपर्क करा:




