आमची मुंबईके पश्चिम विभागमहाराष्ट्रमुंबई

मुंबई महानगर पालिका के पश्चिम चे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले साहेब यांचा जेसीबी सुसाट 

के पश्चिम विभाग मधील भू माफिया यांचे दणाणले धाबे 

मुंबई महानगर पालिका के पश्चिम चे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले साहेब यांचा जेसीबी सुसाट

के पश्चिम विभाग मधील भू माफिया यांचे दणाणले धाबे

सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले ठराविक कामावर कारवाई मधुन सूट देत असल्याचा सामाजिक कार्यकर्ते यांच्या आरोप

 

वर्सोवा कोळीवाडा 5 इमारती, अंधेरी पश्चिम एस वी रोड, संत रामदास गार्डन येथील अवैध बांधकाम वर चालवला जेसीबी

मुंबई – सुप्रीम कोर्टाच्या आदेशा नंतर देश भरात अवैध बांधकाम जमीनदोस्त करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. मुंबई महानगर पालिका मधील के पश्चिम विभाग देखील आपल्या विभाग मध्ये झालेल्या अवैध बांधकाम वर हातोडा चालवत असल्याचे पाहायला मिळत नाही

 

के पश्चिम विभाग मधील वॉर्ड क्रमांक 59 मध्ये वेसावे येथील अनधिकृत पाच बहुमजली इमारतींवर पालिकेच्या के पश्चिम विभाग कार्यालयाच्या वतीने तोडक कारवाई केली

वेसावे भागातील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील दलदलीच्या प्रदेशावर आणि सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रात (सीआरझेड) हे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. हे बांधकाम पाडण्या संदर्भात संबंधितांना पालिकेने नोटीसही बजावण्यात आल्या होत्या. के पश्चिम यांनी दिलेल्या नोटीस यांची कोणीच दखल घेतली नाही . त्याच बरोबर दलदलीच्या क्षेत्रातील इमारती मुळे भविष्यात दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने ही कारवाई करण्यात आली. परिमंडळ ४ च्या पालिका उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे आणि के पश्चिमचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली असून वेसावेतील तेरे गल्लीतील कुटूर हाउस (५ मजली), वेसावे पंप हाउससमोरील साईश्रद्धा निवास (१ मजली), गोमा गल्ली येथील नागा हाऊस (४ मजली), मांडवी गल्ली येथील झेमणे हाऊस (३ मजली), बाजार गल्ली येथील गणेश सागर (३ मजली) या इमारती यावेळी निष्कासित करण्यात आल्या. तर येणाऱ्या काही दिवसात अजून 35 अवैध इमारती वर के पश्चिम विभाग तोडक कारवाई करणार असल्याची माहिती मिळत आहे

आणखी ३५ इमारती

या इमारतींबरोबरच वेसावे भागातील सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रात अशा प्रकारच्या आणखी ३५ अनधिकृत इमारती बांधण्यात आल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. ही बांधकामेही पुढील काही दिवसांमध्ये निष्कासित करण्यात येतील, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अंधेरी पश्चिम एस वी रोड मार्केट समोरील दुकानावर केलेली कारवाई

 

त्याच बरोबर अंधेरी पश्चिम मधील एस वी रोड येथील रस्त्याच्या कडेला दुकानदारांनी केलेल्या वाढीव बांधकाम वर देखील तोडक कारवाई करण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक 65 मधील संत रामदास गार्डन समोर नव्याने बांधण्यात आलेल्या व्रज वन या इमारती मध्ये तळ मजल्यावर अवैध व्यायसिक बांधकाम करण्यात आले होते ते बांधकाम देखील के पश्चिम विभाग यांनी जमीनदोस्त केले आहे.

दाऊदबाग रोड, संत रामदास गार्डन समोर केलेले अवैध बांधकाम

मुंबई महानगर पालिका के पश्चिम विभाग चे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले मोठ्या प्रमाणात तोडक कारवाई करत आहे परंतु काही सामाजिक कार्यकर्ते यांनी आरोप केला आहे की के पश्चिम विभाग मध्ये ठराविक भू माफिया यांना अभय दिले जात असून त्यांच्या कामावर अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झालेली नाही. आता पाहणे गरजेचे आहे की के पश्चिम विभाग मधील सर्व अवैध बांधकाम वर कारवाई होणार का मग ठराविक भू माफिया यांना अभय मिळणार??

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button