अंधेरी पश्चिम विधानसभाआमची मुंबईके पश्चिम विभागमहाराष्ट्रमुंबईसंपादकीयसामाजिक

महाराष्ट्र एकता न्यूज च्या बातमीचा इम्पॅक्ट लिंक रोड चित्रकूट ग्राउंड शेजारील अवैध कार विक्रीवर कारवाई 

ओशिवरा वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव वाघमारे साहेब यांनी घेतली बातमीची दखल

महाराष्ट्र एकता न्यूज च्या बातमीचा इम्पॅक्ट लिंक रोड चित्रकूट ग्राउंड शेजारील अवैध कार विक्रीवर कारवाई

अंधेरी पश्चिम लिंक रोड चित्रकुट ग्राउंड शेजारी  रस्त्यावरच मांडला होत सेकंड हॅण्ड महागड्या गाड्या विक्रीचा व्यवसाय

ओशिवरा वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव वाघमारे साहेब यांनी घेतली बातमीची दखल
नो पार्किंग बोर्ड खालीच सुरू होता ऑडी, मर्सिडीज, BMW सेकंड हॅण्ड महागड्या गाडीचा विक्रीचा व्यवसाय
मुंबई – सामान्य मुंबईकर यांच्यावर तडक फडक आणि कठोर व कडक कारवाई करणारे मुंबई पोलिस यांचे वाहतूक विभाग यांचे ओशिवरा वाहतूक विभाग अंधेरी पश्चिम लिंक रोड येथील चित्रकुट ग्राउंड शेजारी सेकंड हॅण्ड महागड्या गाड्या विक्रीचा व्यवसाय रोडवरच जोमात सुरू असल्याची बातमी मागील अंकात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर ठिकाणी रस्त्यावरच सुरू असलेल्या कार विक्री शोरुम वर ओशिवरा वाहतूक विभाग बघ्याची भुमिका घेत आहे का मग वसुलीची भूमिका घेऊन त्यांना पाठीशी घालत आहे असा सवाल उपस्थित करतातच ओशिवरा वाहतूक विभाग चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव वाघमारे यांनी तात्काळ कारवाई करत सर्व गाड्या काढून टाकल्या.
चित्रकूट ग्राउंड शेजारी अवैध पार्किंग मधून मोकळा केलेला रस्ता
व सदर ठिकाणी पुन्हा रस्त्यावर गाड्या विक्रीचा व्यवसाय सुरू केल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
    महाराष्ट्र एकता न्यूज  मध्ये प्रसिद्ध केलेली बातमी
विशेष म्हणजे मारुती सुझुकी विटेस शोरुम पासून ते लिंक रोड आर टी ओ सिग्नल पर्यंत 30 पेक्षा जास्त वाहने विक्री साठी उभी केली असून नो पार्किंग बोर्ड खालीच ही वाहने विक्री साठी ठेवण्यात आली होती.  सामान्य मुंबईकर यांच्या दुचाकी वाहनावर दिसेल तिथे धडक तडक फडक कारवाई करणारे ओशिवरा वाहतूक विभाग चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे साहेब यांनी सदर ठिकाणी असलेल्या गाड्यावर कारवाई तर केली होती परंतु कारवाई नंतर देखील तिथे कोणताही फरक मात्र जाणवला न्हवता त्या अनुषंगाने मागील अंकात बातमी प्रकाशित केल्या नंतर तात्काळ कारवाई करत सर्व गाड्या हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आता केलेली कारवाई मुळे लिंक रोड वाहतूकसाठी खुला तर झाला पण भविष्यात पुन्हा असा प्रकार होणार नाही याची काळजी ओशिवरा वाहतूक विभाग घेणार का याकडे पहावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button