पालघरच्या माहीममध्ये सर्वद फाउंडेशनतर्फे प्रेरणादायी स्मृतीव्याख्यान सोहळा उत्साहात
डॉ. महेश अभ्यंकर यांचे विद्यार्थ्यांना आरोग्य व करिअर मार्गदर्शन

पालघर – सर्वद फाउंडेशन तर्फे दि. 28 फेब्रुवारी 2026 रोजी पालघर जिल्ह्यातील माहीम येथे माहीम शिक्षण संस्थेच्या भुवनेश कीर्तने विद्यालयात कै. जनार्दन दाजी पाटील स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात औषधतज्ञ, समुपदेशक आणि प्रख्यात व्याख्याते डॉ. महेश अभ्यंकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आरोग्याचे महत्त्व, तणावमुक्त शिक्षण, करिअरची योग्य दिशा आणि सकारात्मक विचारसरणी यावर मार्गदर्शन केले. त्यांच्या सुलभ, प्रभावी आणि उदाहरणांसहित मांडणीमुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. चेतन म्हात्रे, नीलम राऊत तसेच शालेय व्यवस्थापनाने विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण परिसरात कार्यक्रमाबद्दल उत्साहाचे वातावरण होते.
यावेळी सर्वद फाउंडेशनच्या संचालिका डॉ. सुचिता पाटील यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वद फाउंडेशन अशा शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन सातत्याने करत राहील.”

कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



