आमची मुंबईआर्थिकगुन्हेमहाराष्ट्रसायबर फसवणूक

AXIS बँकेच्या नावाने सायबर फसवणूक 84,000 रुपये खात्यातून गायब

ओशिवरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लोखंडवाला परिसरात राहणाऱ्या एका रहिवाशाची फसवूनक

 

 

मुंबई ओशिवरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लोखंडवाला परिसरात राहणाऱ्या एका रहिवाशाची AXIS बँकेच्या नावाने सायबर फसवणूक करण्यात आली. सदर घटना दिनांक 13 मे 2025 रोजी पीडित व्यक्तीला 7348096462 या मोबाईल क्रमांकावरून फोन आला होता. कॉल करणाऱ्या व्यक्ती  स्वत:ला AXIS बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगून त्यांच्याकडून KYC (लयल्टी पॉइंट्स) अपडेटसाठी माहिती मागवली.

सदर व्यक्तीने सांगितलेल्या सूचनांनुसार, Cardsaxis.com या वेबसाइटवर लॉगिन करायला लावण्यात आले. त्यानंतर OTP मागवून खात्यातील रक्कम पळविण्यात आली. ऑनलाईन ग्राफ करून पीडितांच्या AXIS बँकेच्या खात्यामधून ₹84,465 चावऱ्या ऐंशी हजार चारशे पासष्ट रुपये इतकी रक्कम खात्यातून वार झाली.

घटनेनंतर पीडित व्यक्तीने तत्काळ AXIS बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून त्यांच्या क्रेडिट कार्ड संदर्भात माहिती दिली. यानंतर त्यांनी लोखंडवाला येथील AXIS बँकेच्या शाखेत जाऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे.

 

सदर फसवणूक AXIS बँकेच्या नावाने फेक वेबसाइट व बनावट कॉलद्वारे करण्यात आली आहे. संबंधित मोबाईल क्रमांक व वेबसाइट यांच्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहितीही मिळत आहे.

 

त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही बँकेचा फोन आल्यास वैयक्तिक माहिती, OTP, कार्ड क्रमांक यासारखी माहिती शेअर करू नये. बँका कधीच अशा प्रकारे माहिती मागवत नाहीत. कोणतीही शंका असल्यास अधिकृत बँक शाखेशी किंवा हेल्पलाइनशी संपर्क साधावा.

तुम्हाला आमच्या सोबत काम करायचे आहे???

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button